जामखेड येथे अहिल्यादेवी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:20+5:302021-05-01T04:20:20+5:30

जामखेड : शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई ...

Oil paintings of Ahilya Devi, Mahatma Phule, Savitribai Phule at Jamkhed | जामखेड येथे अहिल्यादेवी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र

जामखेड येथे अहिल्यादेवी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र

Next

जामखेड : शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे लक्ष वेधून घेत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने ही तैलचित्रे साकारली आहेत.

विंचरणा नदीच्या काठावर २१ फूट उंच शंकराची मूर्ती, लक्ष्मी चौकात १२ फूट संविधान स्तंभ व आता शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विविध महापुरुषांच्या तैलचित्रांमुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज येथील मुख्य बाजारपेठेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व तपनेश्वर रोड परिसरात शिलादीप हॉस्पिटलच्या इमारतीवर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जवळजवळ ५० फुटी आकाराची अत्यंत विलोभनीय अशी चित्रे पुण्यातील चित्र कलाकार नीलेश आर्टिस्ट यांनी रेखाटली आहेत. या चित्रांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, मदर तेरेसा यांची चित्रेही सार्वजनिक ठिकाणी रेखाटण्यात येणार आहेत.

--

३० जामखेड फुले

Web Title: Oil paintings of Ahilya Devi, Mahatma Phule, Savitribai Phule at Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.