उत्तराने झोडपले दक्षिण जिल्ह्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:12 PM2020-09-17T22:12:34+5:302020-09-17T22:13:01+5:30

अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा पिकाचे या पावसाने नुकसान झाले आहे. आठवड्यापासून सलग पाऊस सुरू आहे.

The north shook the southern district | उत्तराने झोडपले दक्षिण जिल्ह्याला

उत्तराने झोडपले दक्षिण जिल्ह्याला

Next

अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा पिकाचे या पावसाने नुकसान झाले आहे.
आठवड्यापासून सलग पाऊस सुरू आहे. त्यात मंगळवार, बुधवारी नगरसह दक्षिण जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आधीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांमधूनही दुथडी भरून पाणी वाहत आहे. त्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा नद्या, बंधाºयांमधून पाणी वाहू लागले आहे. बुधवारी जिल्ह्यात झालेला पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. अहमदनगर (१३.८), पारनेर (१८.१), श्रीगोंदा (१८.१), कर्जत (१०.९), जामखेड (१८.०),शेवगाव (६.७),पाथर्डी (२७.२), नेवासा (२१.२), राहुरी (२९.५), संगमनेर (५.३), अकोले (३.५),कोपरगाव (६.४),श्रीरामपूर (८.९), राहाता (५.९), सरासरी (१३.४). गुरुवारी आणि शुक्रवारी नगर जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

-----------
आतापर्यंत सरासरी ६३९ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६३९ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही टक्केवारी सरासरी १६६ टक्के आहे.  गतवर्षी याच तारखेपर्यंत सरासरी ३८५ मि.मी., तर १०० टक्के पाऊस झाला होता. यंदाचा पाऊस आतापर्यंत दीडपटीच्या पुढे आहे. 
------------
धरणे ओव्हरफ्लो
गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणांमधून पाण्याचा सुरू असलेला विसर्ग पुढीलप्रमाणे आहे. ओझर बंधारा- १,०४ क्युसेक, नांदुर मधमेश्वर- १६१४ क्युसेक, जायकवाडी धरण-९४३२ क्युसेक, दौंड पुलावरून भीमा नदी-४८३४ क्युसेक, घोड धरण-४३४५ क्युसेक, मुळा धरण-७००० क्युसेक, सीना धरण-५३० क्सुसेक.
----------

Web Title: The north shook the southern district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.