कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 05:38 PM2019-07-24T17:38:53+5:302019-07-24T17:40:18+5:30

शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला.

no water in kukadi dam for seena | कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

Next

बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला. मात्र २००५ च्या कायद्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सीना धरणात सिंचनासाठी कुकडीचे पाणी सोडण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सीना धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे
सीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणारी राज्य शासनाच्या विरोधातील याचिका अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. शिवाजी अनुभले, मिलींद बागल यांनी केली होती.
याचिकेचा निर्णय १५ जुलै १९ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला. या याचिकेवर निर्णय देताना प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. परंतु पूर्वीचे १.२ टीमसी पाणी काढून घेतले. त्यामुळे सीना धरणात शेतीसाठी सोडले जाणारे कुकडीचे पाणी यापुढे बंद होणार आहे. फक्त उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरच कुकडीचे १०० एमसीएफटी पाणी सीना धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे सीनाचा पाणी प्रश्न सुटण्याऐवजी अडचणीचा झाला आहे.
सीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे १.२ टीमसी पाणी सोडण्यासाठी भोसे खिंड बोगदा प्रकल्प शासनाने राबविला. त्यास पाणी उपलब्ध नाही.त्यानंतर शासनाने श्वेत पत्रिका काढली व विशेष तपासणी पथक नेमले. या पथकाच्या अहवालानुसार भोसे खिंड बोगदा दोषयुक्त प्रकल्पाच्या यादीत गेला आहे.
पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी हा बोगदा प्रकल्प कुकडी प्रकल्पास समावेश करणेसाठी प्रयत्न केला. किमान ०.४ टीमसी पाणी समावेश कुकडी प्रकल्प अहवालात तरतुद करणेबाबत प्रयत्न केले. झाले उलटे शासनाने फक्त ०.१ टीमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याचीकाकर्त्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या कोर्टात धाव घेतली. ०.१ टीमसी पाणी जाऊन फक्त टंचाई काळात पिण्याच्या पाण्यावर बोळवण झाली. प्रा. राम शिंदे तसेच याचिकाकर्त्यांचे प्रयत्न जरी प्रामाणिक असले तरी अर्धवट माहितीच्या आधारे अहवाल सादर करण्यात आले. पूर्वी मंजुर होते ते पाणी पण नवीन कायद्याच्या माध्यमातून कमी झाले आहे.

विसापूर व साकळाई अडचणीत
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार १०० उपलब्ध असेल. सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. शासनाने राजकीय मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन उचल अथवा कालव्यांना पाणी देण्यावर धोरण घेतले. तर त्यांना ब्रेक लावले जात आहे. भविष्यात विसापूर खालील सिंचन धोक्यात येणार आहे तर साकळाईचा जन्म होणे अवघड आहे.
 

 

Web Title: no water in kukadi dam for seena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.