शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ना सुविधा, ना सुरक्षेची साधने, तरीही परिचारिकांचा कोरोनाविरोधात लढा; ग्रामीण भागातील परिचारिकांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 2:59 PM

ना सुविधा, ना सुरक्षेची साधने फक्त लोकं कोरोना वॉरियर्स म्हणतात, तेव्हढेच काय ते सुख. बाकी कोरोना संसर्गाची टांगती तलवार घेऊनच ग्रामीण भागातील परिचारिका कोरोनाविरोधात लढा देत आहेत. पदरमोड करुन मास्क व सॅनिटायझर घेऊन स्वत:च्या सुरक्षेसह इतरांचीही सुरक्षा करीत आहोत, अशी व्यथा ग्रामीण भागातील परिचारिका मांडत आहेत.

साहेबराव नरसाळे । अहमदनगर : ना सुविधा, ना सुरक्षेची साधने फक्त लोकं कोरोना वॉरियर्स म्हणतात, तेव्हढेच काय ते सुख. बाकी कोरोना संसर्गाची टांगती तलवार घेऊनच ग्रामीण भागातील परिचारिका कोरोनाविरोधात लढा देत आहेत. पदरमोड करुन मास्क व सॅनिटायझर घेऊन स्वत:च्या सुरक्षेसह इतरांचीही सुरक्षा करीत आहोत, अशी व्यथा ग्रामीण भागातील परिचारिका मांडत आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेत ८२३ तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत ३४५ अशा जिल्ह्यात १ हजार १६८ परिचारिका थेट कोरोना विरोधातील लढ्यात अग्रभागी आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत येणा-या ३४५ परिचारिका रुग्णालयांमध्ये सेवा बजावत आहेत. रुग्णालयात येणा-या कोरोना रुग्णांशी त्यांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे त्यांना पीपीई किट व इतर सुरक्षेची साधने देण्यात आली आहेत.ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सेवेतील परिचारिकांना आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये सेवा बजावत आहेत. त्याशिवाय त्यांना आशा कर्मचा-यांसोबत घरोघर जाऊन सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांना क्वारंटाईन करणे आणि सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर उपचार करणे, त्यांचे रक्ताचे नमुने घेणे अशी अनेक कामे करावी लागतात. त्याशिवाय नियमित कामे, अहवाल पाठविण्याची जबाबदारीही परिचारिकांना पार पाडावी लागते. कोरोनाची  ड्युटी करण्यासाठी प्रारंभी या परिचारिकांना ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ मास्क व सॅनिटायझर एकदाच दिले होते. हे मास्क व सॅनिटायझर संपल्यानंतर परिचारिकांनी  पदरमोड करुन कापडी मास्क व सॅनिटायझर विकत घेतले आहे. त्यावर या परिचारिकांचा लढा सुरु आहे.कामाचा अभिमान वाटतोगावात बाहेरुन, किंवा इतर जिल्हा, राज्य, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना होम क्वारंटाईन करणे, आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करणे, प्रसूती करणे, गावात सर्वेक्षण करणे, विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींची सुविधा पुरविणे, अशी कामे परिचारिकांना करावी लागत आहेत. नियमित कामांबरोबरच कोरोनाच्या अतिरिक्त कामाचा ताणही परिचारिकांवर वाढला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कुरकूर न करता देशसेवा करीत असल्याचा अभिमान वाटतो, असे परिचारिका सांगतात.

परिचारिकांना आरोग्य केंद्रांच्या निधीतून मास्क व सॅनिटायझर पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जर काही परिचारिकांनी स्वत: मास्क घेतले असतील तर तो खर्चही त्यांना आरोग्य केंद्राच्या निधीत टाकता येईल. ग्रामीण भागातील परिचारिका थेट रुग्णांच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे त्यांना पीपीई किटसारखी सुरक्षेची साधने दिली नाहीत. इतर सुविधा व सुरक्षेची साधने पुरविली आहेत़, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ़ संदीप सांगळे यांनी सांगितले.

...प्राप्त साधनांमध्ये आम्ही कोरोनाची ड्युटी करीत आहोत़ स्वत:चे व इतरांचे संरक्षण अशा दुहेरी भूमिकेत राहून आम्हाला जबाबदारी पार पाडावी लागत आहे. कुटुंबीय व परिसरातील लोकं आम्हाला ‘कोरोना वॉरियर्स’ म्हणतात, यातच सारे सुख आले. लोकं कौतुक करतात म्हणून देशाला वाचविण्यासाठी ‘कोरोना’विरोधातील लढ्यात आम्हाला प्रेरणा मिळते, असे जिल्हा परिषद परिचारिका सोसायटीच्या अध्यक्षा इंदू गोडसे यांनी सांगितले.    

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल