शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ना बँड...ना बाराती..सात जणांच्या उपस्थितीत घरातच उरकला लग्नसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 1:39 PM

पिंपळगाव माळवी येथे कोरोनामुळे सात जणांच्या उपस्थितीतच अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा उरकला. 

पिंपळगाव माळवी : विवाह सोहळा म्हटला की हजारो व-हाडी मंडळींची उपस्थिती. बँड, बाराती..थाटमाट अन् जेवणावळीच्या पंगती असे चित्र समोर उभे राहते. परंतु पिंपळगाव माळवी येथे कोरोनामुळे सात जणांच्या उपस्थितीतच अत्यंत साध्या पध्दतीने विवाह सोहळा उरकला. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील प्रियांका बबनराव शिंदे व वळदगाव (ता.श्रीरामपूर) येथील अक्षय प्रकाश माळी यांचा विवाह सोहळा दोन महिन्यापूर्वी ठरला होता. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलला होता. परंतु अक्षयतृतीयेच्या (दि.२६ एप्रिल) दिवशी अवघ्या सात जणांच्या उपस्थितीत पिंपळगाव माळवीत घरातच हा लग्नसोहळा उरकण्यात आला.प्रतिष्ठेला वा हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे पालन या लग्नसोहळ्यात करण्यात आले.  मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्ससिंग यांचे काटेकोर पालन करीत माळी व शिंदे परिवाराने हा लग्न सोहळा पार पाडला. या विवाहासाठी भाऊबंद, नातेवाईक, मित्र परिवार यांना आमंत्रण न देता वधूंच्या आई, वडिलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी नवरदेव दुचाकीवरून वधूच्या घरी हजर झाला होता. विवाहनंतर नवरदेवाच्या दुचाकीवरून नवरीला सासरी पाठविण्यात आले. हा विवाह सोहळा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक