शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच- पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंची गर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:07 PM

बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

पारनेर : आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून सेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे.  बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. मोदी हे देशाला फसवे नेतृत्व भेटले आहे, अशी टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.पारनेर-नगर मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पारनेर येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे बोलत होते. आमदार विजय औटी, जयश्री औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, राणी लंके, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उपप्रमुख रामदास भोसले, गणेश शेळके, सुरेश बोरुडे, दत्तात्रय कुलट, शिवाजी बेलकर उपस्थित होते.निवडणुकीपुरते आम्ही शिवछत्रपतींचं नाव घेत नाही. ‘छत्रपतींचा आशिर्वाद चला देऊ मोदींना साथ, अशी घोषणा देत ते सत्तेत आले आणि निवडणुकीनंतर छत्रपतींविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलायला लागले. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. जसा पक्ष तसा त्याचा प्रतिनिधी असतो. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत. शेतक-यांची वाट लावली. जिल्हा सहकारी बँकांना हे सरकार टाळे लावायला निघाले आहे. ती खरी शेतक-यांची बँक आहे. आज बँका ओरबाडून ते पळून जात आहेत. पण सरकार काहीच करीत नाही. म्हणून यापुढे त्यांच्यासोबत युती केली जाणार नाही. आपण स्वबळावर पुढील निवडणुका लढणार आहोत. महाराष्ट्र मला भगवेमय झालेला पहायचाय. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे म्हणाले.

दारातल्या चपल्या हीच आपली संपत्ती

सेनापती बापट माझ्या आजोबांना म्हणजे केशवराव ठाकरे यांना भेटायला यायचे. आमच्या दादरच्या घरी बैठका व्हायच्या. घर छोटे होते. घराबाहेर चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा खच आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दाखविला आणि म्हणाले, हे काय आहे? वडील म्हणाले, चपला आहेत. तर आजोबा म्हणाले, ‘नाही. हे आपले वैभव आहे. एव्हढे लोकं आपल्याकडं येतात, तेच आपली संपत्ती आहे.’

स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका

२०५० साली शेतक-यांना दुप्पट भाव देऊ, २०२५ साली सर्वांना मोफत घरे देणार अशी घोषणा उद्धव ठाकरे करीत असतानाच लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘अरे टाळ्या काय वाजवता? अशीच स्वप्ने दाखवूनच ते (भाजप) सत्तेत आले. केली का तुमची स्वप्ने पूर्ण? दिले का तुम्हाला अच्छे दिन? म्हणून सांगतो, भानावर या, अशा स्वप्न दाखविणा-यांवर विश्वास ठेवू नका.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना