शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:28 PM

शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे.

केडगाव : शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. या योजनेमुळे तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने जलयुक्त शिवार योजना एक पर्वणी मानून केलेल्या कामांचे फळ आता पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिना संपला की तालुक्यात टँकर सुरु करण्याची लगबग प्रत्येक गावात पहावयास मिळत होती, मात्र यंदा तालुक्यातील एकाही गावात अद्याप टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही किंवा कोणत्या गावाचा यासाठी अजून प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही. १९७२ च्या दुष्काळात तालुक्यात तब्बल २७३ पाझर तलाव बांधण्यात आले. मात्र काळाच्या ओघात हे तलाव गाळाने भरत गेल्याने या तलावांची साठवण क्षमता कमालीची घटत गेली. गावोगावी भूजल पातळी घटत गेली. परिणामी विहिरी व कुपनलिका डिसेंबर संपताच तळ गाठत होत्या. पाणी टंचाईची ही साडेसाती व तीव्र दुष्काळाच्या झळा तालुक्याने वर्षानुवर्षे सहन केल्या. पण जलयुक्त शिवार योजना आता तालुक्याला संजीवनी ठरली आहे.जलयुक्तच्या योजनेत पहिल्या वर्षी १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा यात सहभाग झाला या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली.यावर्षी २० गावांनी या योजनेत सहभाग नोंदवत जलयुक्तची कामे सुरु केली आहे. यात प्रामुख्याने गावातील नदीचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गुंडेगाव या गावाने हिवरेबाजारचा आदर्श समोर ठेऊन तालुक्यात प्रथम ही चळवळ लोकसहभागातून सुरु करून दुष्काळावर कायमची मात केली. गुंडेगावमध्ये झालेला कायापालट पाहून तालुक्यातील इतर गावांनी या योजनेत सहभागी होऊन लोकवर्गणी तर सरकारच्या आर्थिक मदतीने आपले गाव जलयुक्त करण्यास पुढाकार घेतला.या योजनेतून बांध बंदिस्ती, नदी खोलीकरण, समतल चर अशी विविध कामे करून पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच मोठ्या प्रमाणात अडविण्याचे काम केले. यामुळे मागील वर्षी झालेल्या पावसाने गावातील शिवार जलयुक्त झाले. गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत मिळाली.

योजनेत सहभागी गावे

निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव, भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुबा, मदडगाव, बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे,वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी.

यावर्षी सहभागी गावे

शेंडी, ससेवाडी, डोंगरगण, पोखर्डी, जेऊर, पिंपळगाव उज्जेनी, आव्हाडवाडी, मांडवे,पिंपळगाव, लांडगा, कौडगाव, देऊळगाव सिध्दी, रुई छत्तीसी, उक्कडगाव, बाबुर्डी घुमट, वाडगाव तांदळी, नेप्ती, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा, कामरगाव, पिंपळगाव कौडा.

नगर तालुक्याने अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या. मात्र जलयुक्तच्या कामामुळे गावे पाणीदार बनत आहेत. याचा परिणाम सकारात्मक होत असल्याने अद्याप कोणत्याच गावाला टँकरची गरज भासली नाही.-रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर