नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:27 AM2018-12-20T10:27:34+5:302018-12-20T10:27:38+5:30

नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला

Nagar-Kalyan Highway: Two people were struck by the tempo in Bhadvh varga | नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले

नगर-कल्याण हायवे :भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले

Next

टाकळी ढोकेश्वर : नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे हा भीषण अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातामध्ये पोपट वाळुंज यांचा जागीच मृत्यू झाला.
टाकळी ढोकेश्वर येथील ढूस वस्तीजवळ ही घटना घडली. सकाळी टाकळी अनेक लोक नित्यनेमाने चालण्यास जातात. नेहमीप्रमाणे पोपट वाळुंज आणि बबन रखमा ढूस हे सकाळी चालत होते. यावेळी कल्याणकडून नगरच्या दिशेने येणा-या भरधाव वेगातील टेम्पोने दोघांना चिरडले. यामध्ये पोपट वाळुंज यांचा जागीच मृत्यू झाला. तर ढुस हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगरचा उपचारासाठी हलविण्यात आले आहे. टेम्पो पलटी झाल्याने चालक मनेश आव्हाड याला पण मार लागल्याने गंभीर जखमी आहे. त्यालाही उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Nagar-Kalyan Highway: Two people were struck by the tempo in Bhadvh varga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.