नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ८७१ कर्मचाऱ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:19 AM2021-01-17T04:19:45+5:302021-01-17T04:19:45+5:30

अहमदनगर : कोरोना लसीकरणाला शनिवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील ८७१ जणांना लस टोचण्यात आली. त्यामध्ये श्रीरामपूर ...

In Nagar district, 871 employees were vaccinated on the first day | नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ८७१ कर्मचाऱ्यांना लस

नगर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ८७१ कर्मचाऱ्यांना लस

Next

अहमदनगर : कोरोना लसीकरणाला शनिवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी शनिवारी जिल्ह्यातील ८७१ जणांना लस टोचण्यात आली. त्यामध्ये श्रीरामपूर व संगमनेर ग्रामीण रुग्णालयात अनुक्रमे ९९ व १०० कर्मचाऱ्यांनी लस घेवून सर्वाधिक लसीकरणाचा मान मिळविला.

शनिवारी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर लसीकरण पार पडले. रात्री आठ वाजेपर्यंत ८७१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली होती. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय (९०), पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय (८६), कर्जत उपजिल्हा रुग्णालय (३६), शेवगाव ग्रामीण रुग्णालय (८०), श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय (९९), राहाता ग्रामीण रुग्णालय (४०), संगमनेर ग्रामीण रुग्णालय (१००), अकोले ग्रामीण रुग्णालय (७८), नगर शहरातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र (६५), जिजामाता नागरी आरोग्य केंद्र (७७), केडगाव नागरी आरोग्य केंद्र (६९), नागापूर नागरी आरोग्य केंद्र (५०) या केंद्रावर लसीकरण झाले. (सविस्तर वृत्त हॉलो एक वर)

Web Title: In Nagar district, 871 employees were vaccinated on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.