शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

भाऊबीजेच्या करदो-यासाठी राबतात मुस्लिम हात; चिचोंडी पाटील येथे अनेक वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 4:00 PM

हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीतील भाऊबीजेसाठी बनविला जाणारा करदोरा चिंचोडी पाटील (ता. नगर) येथील मुस्लिम कुटुंबीय बनवितात. येथील ही हिंदू-मुस्लिम ऐक्याची गेल्या अनेक वर्ष सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे.

संजय ठोंबरे ।  चिचोंडी पाटील : हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीतील भाऊबीजेसाठी बनविला जाणारा करदोरा चिंचोडी पाटील (ता. नगर) येथील मुस्लिम कुटुंबीय बनवितात. येथील ही हिंदू-मुस्लिम ऐक्याची गेल्या अनेक वर्ष सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे.दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा), भाऊबीज असे वेगवेगळे उत्सव असतात. त्यात प्रत्येकाचे एक वेगळे असे महत्त्व आहे. यातील एक म्हणजे भाऊबीज हा महत्त्वाचा उत्सव असतो. हा दिवस बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. आपल्या भावास कुंकूवाचा टिळा लावून ओवाळते. सोबत त्याच्या रक्षणार्थ करदोरा देते. या काळात असे करदोरे सहज उपलब्ध होतात. हे करदोरे म्हणजे अनेक मुस्लिम कुटुंबांच्या परिश्रमाचे फलित असते. हे किचकट काम दिवाळीच्या काम आठ महिने अगोदरच सुरू होते. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मुस्लिम कुटुंबीय अनेक वर्षांपासून करदोरे बनविण्याचे काम करत आहेत. दिवसातील बारा ते पंधरा तास एका जागेवर बसून हे काम करावे लागते. सध्या कारागिरांची करदोरे बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काळ्या व लाल अखंड गोपाचे वेगवेगळ्या लांबीचे तुकडे करण्यासाठी येथील कारागिरांनी त्यांच्या संकल्पनेतून यंत्रे बनविली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दुस-या दिवसापासून वेगवेगळ्या गावात, शहरात जाऊन हे करदो-यांची विक्री केली जाते. करदोरा विक्री सुमारे महिनाभर चालते. येथील करदो-यांना मुंबई, नवी मुंबई, पुणे, बीड, नगर जिल्ह्यातून मोठी मागणी असते. नव्या पिढीची व्यवसायाकडे पाठ...करदोरा तयार करण्याचा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. परंतु नवीन पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यांचा अन्य व्यवसायाकडे कल वाढत आहे. करदोरा तयार करताना तो पूर्ण होईपर्यंत पाचवेळा हाताळला जातो. बैठ्या कामामुळे गुडघेदुखी, पायास सूज येणे असे विकार जडतात, असे करदोरा कारागीर रफिक मनियार यांनी सांगितले.महिला गृह उद्योगात समावेश कराआठ महिने चालणा-या या व्यवसायाचा महिला गृह उद्योगामध्ये समावेश व्हावा. यासाठी कर्ज पुरवठा झाल्यास उद्योगास चालना मिळेल. गरीब कुंटुंबांना हातभार लागेल, अशी अपेक्षा करदोरे बनविणा-या महिला कारागिरांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर