शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

मुंबई-पुणे-नाशिक रेल्वेमार्गास मंजुरी,१८० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:55 AM

संगमनेर : नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणाच्या विकासात व औद्योगिकीकरणात मोलाची भर टाकणाºया नाशिक-पुणे रेल्वे महामार्गास केंद्र सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली.

संगमनेर : नाशिक-पुणे-मुंबई या सुवर्ण त्रिकोणाच्या विकासात व औद्योगिकीकरणात मोलाची भर टाकणाºया नाशिक-पुणे रेल्वे महामार्गास केंद्र सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. मुंबई-पुणे-नाशिक हा कॉरिडोअर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. नाशिक-पुणे रेल्वे ही अत्यंत महत्वाची आहे. यासाठी  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे, डॉ.अमोल कोल्हे, नाशिकचे खासदार व या विभागातील पदाधिकाºयांनी सातत्याने पाठपुरावा केला. या रेल्वे महामार्गामुळे नाशिक व पुणे ही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या लोहमार्गाची एकूण लांबी २३१.६७  किलोमीटर असून त्यापैकी १८० किलोमीटरचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर या भागातून हा रेल्वे महामार्ग निश्चित झालेला असून केंद्रीय मंत्रीमंडळाने त्यास नुकतीच तत्वत: मंजुरी दिली आहे.---------राज्य सरकारही मंजुरी देणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची मंजुरी लवकर होणार आहे. कर्ज प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रकल्प खर्चास मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे. शिर्डीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेसेवा यामुळे या भागात विकासाचे आणखी एक नवे पर्व सुरु होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात यांनी सांगितले.