शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

राहुरीजवळ मोटारसायकल-पिकअपचा अपघात; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 7:11 PM

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने जाणा-या पिकअप व्हॅनने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे़ त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.राहुरीकडून नगरच्या दिशेने ...

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर नगर-मनमाड रोडवर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने जाणा-या पिकअप व्हॅनने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे़ त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.राहुरीकडून नगरच्या दिशेने हे दोघे तरुण मोटारसायकल (क्रमांक एमएच- १७, एल ९७९३) वरुन जात होते. त्यांची मोटारसायकल राहुरी कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन चिकित्सालय व कृत्रिम रेतन केंद्राच्या गेटसमोर आली असताना विरुद्ध दिशेने जाणा-या एमएच-१७, टी-७५८० या पिकअपने या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलवरील दोघाही तरुणांच्या डोक्याला मार लागला आहे. एका तरुणाच्या डोक्यातून व नाकातून रक्त वाहत होते. हात-पाय फ्रॅक्चर झाल्याचे दिसत होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून दोघांनाही नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. यातील एकाजणाची प्रकृती गंभीर आहे. संबंधित अपघातग्रस्त पिकअप व्हॅन राहुरी विद्यापीठाच्या सेवेत असून, ही पिकअप व्हॅन रोज अशीच विरुद्ध दिशेने जाते आणि पुढे काही अंतरावर गेल्यानंतर टर्न घेऊन विद्यापीठात जाते, असे स्थानिकांनी सांगितले. या पीकवरही राहुरी कृषी विद्यापीठ असे लिहिलेले आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे अद्याप समजली नाहीत. जखमी तरुण वरवंडी (ता. राहुरी) येथील असल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीAccidentअपघात