शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सैन्यदलातील सुभेदाराकडून नगरमधील अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 8:28 PM

सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते.

अहमदनगर : सैन्यदलात नोकरीचे अमिष दाखवून उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटी रूपयांचा गंडा घालणा-या वाळकी (ता. नगर) येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (इंजिनिअरिंग रेजिमेंट, तवांग) याने नगरमधील अनेकांना नोकरीच्या अमिषाने गंडा घातल्याचे समजते.शेख हा सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन त्याने एजंटामार्फत उत्तर महाराष्ट्रातील ३०० तरूणांकडून पैसे घेऊन त्यांना लष्करात नोकरी देण्याचे अमिष दाखविले. पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने दोन महिन्यापूर्वी पाचोरा (जि. जळगाव) परिसरातील तरूण वाळकी येथे आले होते. यावेळी शेख याने या मुलांची समजूत घालून थोड्याच दिवसांत तुम्हाला नियुक्तीपत्र मिळेल असे सांगितले होत. या तरूणांना मात्र नियुक्तीपत्र न मिळाल्याने त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात शेख याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पाचोरा पोलीसांनी तीन दिवसांपूर्वी वाळकी येथे येऊन शेख याच्यासह त्याची पत्नी व मुलाला ताब्यात घेतले.शेख याने वाळकी येथील १५ तरूणांना नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले होते. शेख याचा भंडाफोड झाल्यानंतर वाळकीच्या तरूणांनी त्याच्याकडून पैसे वसूल केले. बाहेरील जिल्ह्यातील मुलांचे पैसे मात्र अडकले. नगर तालुक्यातील विविध गावातील तरूणांकडून त्याने नोकरीच्या अमिषाने पैसे घेतले असल्याची माहिती समजते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस