शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

स्थानिकसह आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण असणारा उमेदवार हवा : लोकमत अहमदनगर लाइव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 6:31 PM

लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत.

अहमदनगर : लोकशाहीला बळकटी येण्यासाठी चांगल्या उमेदवाराला मतदान करणे महत्वाचे आहे. संसदेमध्ये जाणा-या प्रतिनिधीला देशाचे तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न समजले पाहिजेत. त्याचबरोबर स्थानिक प्रश्नांचीही त्यास जाण असावी, असे मत ‘लोकमत’ अहमदनगर फेसबुक पेजवरील चर्चेदरम्यान तरुणांनी मांडले. चर्चासत्रामध्ये संज्ञापन अभ्यास विभागाचे विभागप्रमुख डॉ.बापू चंदनशिवे, डॉ.बाळासाहेब पवार, प्रशांत शिंदे, अमोल सुरनरकर, मोनाली धोंडे, सुधीर पाटील सहभागी झाले होते.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)डॉ. बापू चंदनशिवे म्हणाले, लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुका. लोकशाही निवडणुकांमधून दिसून येते. अजूनही लोकशाही तळागाळात पोहचलेली दिसून येत नाही. लोकशाही समजण्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकशाही टिकवणे आणि समृध्द करणे मतदाराचे कर्तव्य आहे. त्याकरीता चांगल्या उमेदवाराला मतदान करावे. केवळ पैशाच्या आधारे, जातीच्या आधारे मत मागणा-या उमेदवाराला मतदान करू नये.प्रा. बाळासाहेब पवार म्हणाले, नागरिकांमध्ये निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. फक्त सत्ता बदलणे एवढाच लोकशाहीचा उद्देश नाही. देश बळकट करण्याची ही प्रक्रिया नाही. देशाच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र चर्चा करावी. सध्या अगोदरच पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला जात आहे. हे चुकीचे आहे. संसदीय लोकशाहीला हे घातक आहे. समाजमाध्यमांच्या हातात निवडणुक आलेली आहे. पक्ष जरी वाढले असले तरी लोकशाही यामाध्यमातून बळकट होत आहे. सरकार तरुण, शेतीच्या प्रश्नांकडे पक्ष गांभीर्याने पाहात नाही. राष्ट्रवादही निर्माण केला जात आहे. स्थानिक प्रश्नावर, देशाअंतर्र्गंंत प्रश्नांवर निवडणूक केंद्रित झाली पाहिजे.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)येथील दोन्हीही उमेदवार तरुण आहेत पण दोघेही प्रस्थापित आहेत. शेतक-यांचे प्रश्न मांडणा-या तरुणांना संधी मिळत नाही. शहराचा विकासच झाला नाही. ग्रामीण भागातील समस्या मोठ्या आहेत. दक्षिण नगर पुर्णत दुष्काळी आहे. तरुण मतदानासाठी उतरल्यानंतर आपला प्रश्न कोण सोडवू शकतो त्यालाच मत देतील. धार्मिक किंवा इतर बाबींचा नक्कीच विचार करणार नाही. मतदान करताना ठराविक पक्षाचा विचार आम्ही करत नाही. उमेदवार चांगला निवडणे गरजेचे आहे. त्यासाठी चौकस विचार करून उमेदवार निवडण्याची गरज आहे. सुशिक्षित आणि हुशार, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न मांडणारा असावा. निवडणुकीत महिलांना फार कमी संधी मिळते. महिलांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. उमेदवाराने दिलेली आश्वासने पाळावीत. जो आपले प्रश्न सोडवेल त्यालाच निवडूण द्यावे. अहमदनगरमध्ये एमआयडीसीचा मोठा प्रश्न आहे. शैक्षणिक वातावरणही आणखी प्रगल्भ करता येईल. स्पर्धा परिक्षेसाठी चांगली मार्गदर्शन केंद्र नाहीत. स्थानिक पातळीवर या सर्व सुविधा निर्माण करणारा उमेदवार निवडणे गरजेचे आहे. जाहीरनाम्यामध्ये नेमके काय केले आहे. त्याचाही तरुणांनी अभ्यास करावा. राजकिय पक्ष तरुणांचा वापर करून घेताहेत हे जरी खरे असले तरी ही संख्या खूप कमी आहे. तरुण दिवसेंदिवेस हुशार होत आहेत. राष्ट्रवाद, जातीयवाद या मुद्द्याच्या पलीकडे निवडणूक गेली पाहिजे. प्रस्थापितांना उमेदवारी दिली तरी आपल्याकडे नोटाचा पर्याय आहे. आपण आपला हक्क वापरून मागण्या दाखवून दिल्या पाहिजे. समाजाला पोषण असणा-या पक्षाला, उमेदवाराला मतदान करावे. त्यानंतर देशाचे भविष्य उज्ज्वल राहिल.(व्हिडिओ पाहण्यासाठी https://m.facebook.com/story.php?story_fbid=341808429805612&id=541922295950969 येथे भेट द्या)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकahmednagar-pcअहमदनगर