जीव धोक्यात घालणाऱ्या परिचारिका अर्धपोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:07+5:302021-05-12T04:22:07+5:30

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दीडशे अधिपरिचारिका तर २५९ परिचारिका आहेत. या सर्व परिचारिका कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. अधिपरिचारिकेला ...

Life-threatening nurse half-baked | जीव धोक्यात घालणाऱ्या परिचारिका अर्धपोटी

जीव धोक्यात घालणाऱ्या परिचारिका अर्धपोटी

Next

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात दीडशे अधिपरिचारिका तर २५९ परिचारिका आहेत. या सर्व परिचारिका कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. अधिपरिचारिकेला मासिक वीस हजार तर परिचारिकेला १८ हजार रुपये मानधन मिळते. हे मानधन अलीकडे वाढले. मानधनाची सुरुवात सहा हजारांपासून झाली होती. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व कामे करावी लागतात. किंबहुना त्यांना जास्त राबवून घेतले जाते. शिवाय कंत्राटी कर्मचारी असल्याने नोकरी जाण्याची टांगती तलवारही कायम असते. नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन मात्र खूपच तुटपुंजे आहे.

सध्या या कंत्राटी परिचारिका जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. मात्र कोरोनात जोखीम घेऊन काम केल्यानंतरही शासन या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत विचार करताना दिसत नाही.

.......................

आज जागतिक परिचारिका दिन आहे. आम्ही जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र असा काय गुन्हा केला की आठ-दहा वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर राबत आहोत. कोरोनात रुग्णांची सेवा करताना आमच्या जीवाची व परिवाराचीही चिंता केली नाही. आमचे नोकरीचे वय संपत चालले तरी शासन आम्हाला नियमित करायला तयार नाही. कोरोना योद्धा म्हणायचे व उपाशी पोटी ठेवायचे ही कुठली नीती आहे?

- एक कंत्राटी परिचारिका

Web Title: Life-threatening nurse half-baked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.