शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा सर्वात मोठा पुतळा उभारणार-गोपीचंद पडळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 11:41 AM

चौंडी (जि. अहमदनगर) :  देशातील विद्यापीठांमध्ये सध्या विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि अहिल्यादेवींचा सर्वात उंचीचा पुतळा सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत, असे धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.

चौंडी (जि. अहमदनगर) :  देशातील विद्यापीठांमध्ये सध्या विविध महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि अहिल्यादेवींचा सर्वात उंचीचा पुतळा सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत, असे धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी सांगितले.अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे जन्मस्थळी पडळकर यांनी आज सकाळी अभिवादन केले. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना पडळकर म्हणाले, मागच्या सरकारने सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असे नाव दिले आहे. आता या विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्याचा संकल्प चौंडी या त्यांच्याच जन्मस्थळामधून करीत आहे. चांगल्या दिवशी चांगला संकल्प करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे तमाम धनगर समाजाच्यावतीने हा संकल्प केला जात आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त काही तरी संकल्प केला पाहिजे, असे मनात होते. देशभरामध्ये सातशेपेंक्षा जास्त विद्यापीठ आहेत. प्रत्येक विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे आहेत. या पुतळ््यांपेक्षा वेगळा आणि सर्वात मोठा अहिल्यादेवींचा पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत. सोलापूर विद्यापीठामध्ये दोन प्रशासकीय इमारती आहेत. एक  जुनी इमारत ३२ एकरात आहे.  आता ४३२  एकरामध्ये नवीन इमारतीचे काम सुरू आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. अनेक संकल्प त्यांच्याकडे व्यक्त केले आहेत, असेही पडळकर म्हणाले. अखिल महाराष्ट्राच्या,धनगर समाजाच्यावतीने केलेला हा संकल्र लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.देशामध्ये लॉकडाऊन आहे. अहिल्यादेवींचा जयंती सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला आहे. चौंडीचा परिसर माजी मंत्री अण्णा डांगे यांच्यामुळे देखणा परिसर होऊ शकला. राम शिंदे, महादेव जानकर यांचेही यामध्ये योगदान आहे, असेही पडळकर म्हणाले.