महाराष्ट्रात रंगणार नामवंत मल्लांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:55 PM2017-08-14T18:55:15+5:302017-08-14T18:56:15+5:30

कुस्ती प्रिमीयर लीगमध्ये महाराष्ट्र केसरी, कुमार केसरी तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या मल्लांना संधी मिळणार आहे़

kusti premier league | महाराष्ट्रात रंगणार नामवंत मल्लांचा थरार

महाराष्ट्रात रंगणार नामवंत मल्लांचा थरार

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील मल्लांसह १६ राष्ट्रीय व १६ आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग

अहमदनगर: महाराष्ट्रातील नामवंत आणि दर्जेदार मल्लांना व्यासपीठ मिळावे तसेच दुर्लक्षित होत असलेल्या कुस्तीला गतवैभव प्राप्त व्हावे या उद्देशातून अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्यावतीने महाराष्ट्र कुस्ती प्रिमीयर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ येत्या नोव्हेंबर महिन्यांत नगरसह कोल्हापूर, पिंपरी चिंचवड येथे या स्पर्धा होणार असल्याचे रविवारी स्पर्धेचे आयोजक व जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़
कुस्ती प्रिमीयर लीगमध्ये महाराष्ट्र केसरी, कुमार केसरी तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या मल्लांना संधी मिळणार आहे़ यामध्ये महाराष्ट्रातील मल्लांसह १६ राष्ट्रीय व १६ आंतरराष्ट्रीय मल्लांचा सहभाग राहणार आहे़ द ग्रेट खली व योगेश्वर दत्त हे या स्पर्धेचे ब्रॅण्डिंग करणार आहेत़ कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्टेडियममध्ये स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे पात्रता फेरी होऊन नगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात अंतिम फेरी रंगणार आहे़
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष राम लोंढे, सचिव धनंजय जाधव, नामदेव लंगोटे, दत्तात्रय अडसुरे, राम नळकांडे, नाना डोंगरे, हंगेश्वर धायगुडे, विलास चव्हाण, छबुराव जाधव आदी उपस्थित होते़
६१ लाख रूपयांचे बक्षीस
महाराष्ट्र कुस्ती प्रिमियर लिग स्पर्धेत एकूण ६१ लाख रूपयांची बक्षिसे आयोजकांमार्फत देण्यात येणार आहेत़ यामध्ये प्रथम विजेत्या संघाला २१ लाख रूपये व अर्धा किलो सोन्याची गदा देण्यात येणार आहे़ प्रथम बक्षीस उद्योजक सायरस पुनावाला यांच्यावतीने देण्यात येणार आहे़ द्वितीय बक्षीस ११ लाख रूपये रोख व पाच किलो चांदीची गदा देण्यात येणार आहे़ तृतीय बक्षीस ७ लाख रूपये व चषक देण्यात येणार आहे़
....
या मल्लांचा राहणार सहभाग
राहुल आवारे (पुणे), उत्कर्ष काळे (पुणे), माउली जमधाडे (सोलापूर), किरण भगत (सातारा), सागर बिराजदार (लातूर), बाला रफिक शेख (सोलापूर) राकेश कुमार (मुंबई), संदीप काटे (मुंबई), गोपाळ यादव (मुंबई), मारूती जाधव (सांगली), अनिल जाधव (जालना), विष्णू खोसे (अहमदनगर), किशोर नखाते (पिंपरी चिंचवड), विजय पाटील (कोल्हापूर), अजित शेळके (अहमदनगर), संतोष गायकवाड (अहमदनगर), विक्रम शेटे (अहमदनगर), संग्राम पाटील (कोल्हापूर), विकास जाधव (सोलापूर), जयदीप गायकवाड (सातारा), समीर देसाई (कोल्हापूर), रणजित नलावडे (कोल्हापूर), नामदेव कोकाटे (पुणे) शिवराज राक्षे (पुणे)़

 

 

Web Title: kusti premier league

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.