सशस्त्र दरोड्याने केडगाव हादरले; बंदुकीच्या धाकाने मारहाण करत लुटले सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:40 AM2020-09-10T11:40:55+5:302020-09-10T11:41:24+5:30

अहमदनगर: नगर जिल्ह्यात सध्या दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. विसापूर फाटा आणि निर्मळपिंपरी येथील दरोडा आणि खुनाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी रात्री नगर शहराजवळील केडगाव येथे धाडसी दरोडा पडला.

Kedgaon shaken by armed robbery; Gold looted by beating with a gun | सशस्त्र दरोड्याने केडगाव हादरले; बंदुकीच्या धाकाने मारहाण करत लुटले सोने

सशस्त्र दरोड्याने केडगाव हादरले; बंदुकीच्या धाकाने मारहाण करत लुटले सोने

googlenewsNext

अहमदनगर: नगर जिल्ह्यात सध्या दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे. विसापूर फाटा आणि निर्मळपिंपरी येथील दरोडा आणि खुनाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी रात्री नगर शहराजवळील केडगाव येथे धाडसी दरोडा पडला. चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक  दाखवून  मारहाण करत पाच तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. या घटनेने केडगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रमाकांत महादेव पराळे (वय 55) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर पराळे यांच्या घरात घुसले. यावेळी घराबाहेर झोपलेल्या पराळे यांच्या मेव्हण्यास बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केली.

दुसऱ्या दरोडेखोरांने पराळे यांना बंदुकीच्या मागील बाजूने डोक्यात व पोटात मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन काढून घेतली यावेळी अणखी एका दरोडेखोरांनी त्यांच्या पाठीला चाकू लावून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.

दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान जिल्ह्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लूटमार, दरोडे आणि खुनाच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सराईत गुन्हेगारांचा बीमोड करण्यास पोलिसांना पुरते अपयश आल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

Web Title: Kedgaon shaken by armed robbery; Gold looted by beating with a gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.