केदारेश्वर कारखाना, सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:21 AM2021-04-20T04:21:07+5:302021-04-20T04:21:07+5:30

बोधेगाव/टाकळीमानूर : केदारेश्वर साखर कारखाना व कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानकडून शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यात साधारणतः १०० बेडचे ...

Kedareshwar Factory, Sumantai Dhakne Pratishthan to set up 100-bed Kovid Center | केदारेश्वर कारखाना, सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर

केदारेश्वर कारखाना, सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान उभारणार १०० बेडचे कोविड सेंटर

Next

बोधेगाव/टाकळीमानूर : केदारेश्वर साखर कारखाना व कै. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानकडून शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यात साधारणतः १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

या संकटात सर्वसामान्य कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी मदतीचा हात देणारा केदारेश्वर कारखाना जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.

शेवगाव तसेच पाथर्डी तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्य रूग्णांना उपचारासाठी धावाधाव करावी लागते आहे. एवढे करूनही वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध होईल याची शाश्वती नाही. दोन्ही तालुक्यातील आरोग्य विभाग रूग्णांना उपचार देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विषयक सर्व यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण पडताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांना दिलासा देण्याबरोबरच आरोग्य यंत्रणेला आधार देण्यासाठी दोन्ही तालुक्यात कोरोना रूग्णांसाठी सर्व सुविधायुक्त असे सेवा केंद्रे तत्काळ उभारत असल्याची माहिती ॲड. ढाकणे यांनी दिली.

साखर कारखान्याच्या वतीने कोविड सेंटर उभारण्यात केदारेश्वर कारखान्याने जिल्ह्यात पहिले पाऊल टाकले आहे. या माध्यमातून केदारेश्वरने इतरांसमोर आदर्श उभा केला आहे. संकटकाळात मदतीचा हात देण्याच्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

-

---

बोधेगावात, पाथर्डीत प्रत्येकी ५० बेडची सुविधा..

बोधेगाव येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखाना येथील इमारतीत ५० बेड व पाथर्डी येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयातील इमारतीमध्ये ५० बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रूग्णांना सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा आरोग्य विभाग व संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

--

गरज भासल्यास.. आणखी कोविड सेंटर

सामाजिक जाणीवेतून शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ही कोविड सेंटर कार्यरत राहणार आहेत. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन दुर्दैवाने पुढे गरज भासल्यास आणखी काही ठिकाणी कोविड सेंटर उभारू. परंतु, अशी वेळ येऊ नये, अशी प्रार्थनादेखील ॲड. प्रताप ढाकणे यांनी यावेळी केली.

--

१९प्रताप ढाकणे

Web Title: Kedareshwar Factory, Sumantai Dhakne Pratishthan to set up 100-bed Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.