कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:28 PM2020-03-29T16:28:03+5:302020-03-29T16:29:13+5:30

कर्नाटकमध्ये अडकलेल्या कामगारांना घेऊन कर्नाटक सरकारच्या ६५ एस.टी. बस राजस्थानकडे निघाल्या आहेत. या बस नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव (ता.कर्जत) येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी  साडेतीन वाजता थांबल्या होत्या.

Karnataka govt leaves for Rajasthan; २६०० Worker departure | कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान

कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान

Next

मिरजगाव : कर्नाटकमध्ये अडकलेल्या कामगारांना घेऊन कर्नाटक सरकारच्या ६५ एस.टी. बस राजस्थानकडे निघाल्या आहेत. या बस नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव (ता.कर्जत) येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी  साडेतीन वाजता थांबल्या होत्या.   
    कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बाहेर राज्यातून आलेले कामगार आपल्या आपल्या गावी पायी  निघाल्याचे चित्र देशात आहे. असे असतानाही कर्नाटक राज्यात अडकलेल्या राजस्थानमधील २६०० कामगारांना विजापूर येथून या ६५ बस राजस्थानकडे निघाल्या आहेत.  कर्नाटक सरकारच्या या बस रविवारी साडेतीन वाजता मिरजगाव येथे काही काळ थांबल्या होत्या. यावेळी मिरजगाव ग्रामपंचायत, संकल्प ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने त्यांना फळे, बिस्कीटाचे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले. यासर्व कामगाराची कर्नाटक सरकारने कोरोना टेस्ट केली आहे, असे सांगण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, निशीकांत घोडके, डिंगाबर नवले उपस्थित होते. 
 

Web Title: Karnataka govt leaves for Rajasthan; २६०० Worker departure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.