शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पारनेर : आमदारांच्या वचनांचे ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 4:52 PM

मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले

पारनेर : मतदारसंघातील बहुतांश भागात वीजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यासाठीच बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील १३२ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले. मात्र तेथून इतर गावांत वीजपुरवठा जोडलेला नाही. त्यामुळे ते उपकेंद्र सध्या तरी नावालाच ठरले आहे. याशिवाय अळकुटी परिसरातील काही भागातही विजेचा वारंवार लपंडाव सुरू असतो. काही बिघाड झाल्यास दोन ते तीन दिवस दुरुस्ती होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.आमदाराचे नाव : विजय औटीमतदारसंघ : पारनेर-नगरटॉप 5 वचनं1 जलयुक्त शिवार योजना राबवणार2 रस्ते विकासाला प्राधान्य3 वंचित लोकांना मुख्य प्रवाहात आणणार4 आदिवासींना जमिनी देणार5 वीज पुरवठा सातत्याने मिळणारवचनांचं काय झालं?1 जलयुक्तमधून अनेक बंधारे उभारले2 काही भागात वीज पुरवठ्याचा प्रश्न कायम3 कुकडी पाणी नियोजनात अपयश4 काही आदिवासींना जमीन दिली5 अनेक भागात रस्त्यांची कामे पूर्णहे घडलंय...1 ३२ हजार संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी2 प्रमुख रस्त्यांचे बळकीटकरण3 विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी १५ वीज उपकेंद्र4 आदिवासींना हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या5 मुळा नदीवर पारनेर-राहुरीला जोडणारा पूल उभारलाहे बिघडलंय...1 मतदारसंघात शेतीसाठी शाश्वत पाणी स्त्रोत नाही.2 १६ गावांची पाणी योजना विजबिलाअभावी बंद3 १४ गावांना कालव्याचे नियमित पाणी नाही4 सुपा एमआयडीसीत गुंडागर्दी वाढलीदुष्काळी भागात शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविणे गरजेचे होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. मतदारसंघात नद्या, ओढे, नाले जोडण्याचा प्रकल्प करायला हवा. -अनिल देठे, नागरिक, पारनेरसुपा एमआयडीसीमध्ये भूमिपुत्रांना नोकºया मिळणे आवश्यक आहे. सध्या युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून देणे आवश्यक होते. दुष्काळामुळे दूध धंदा संकटात सापडल्याने दूध दरासाठी लढा देण्याची गरज होती. -विक्रमसिंह कळमकर,वाडेगव्हाण

विधीमंडळातील कामगिरीविजय औटी यांनी विधीमंडळामध्ये राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या वृद्ध, निराधार, विधवा यांना वेळेवर अनुदान मिळण्यासाठी प्रश्न उपस्थित करून मार्गी लावला. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अत्यावश्यक कायद्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारला भाग पाडले. मागील वर्षी विजय औटी यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. त्यातून त्यांनी मतदारसंघात सर्वाधिक विकास निधी आणला.पाच वर्षांत काय केलं?दुष्काळी पारनेर-नगर मतदारसंघात बंधारे बांधून शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न. सर्व रस्त्याचे मजबुतीकरण, ग्रामीण भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जोडून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिली. पळशी, तास, वनकुटे भागातील शेतकरी, आदिवासी यांना हक्काची जमीन मिळवून दिली. पारनेर-राहुरी तालुका जोडणाºया मुळा नदीवरील तास येथील पुलाची उभारणी.119 किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र तरीही मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांची कामे होणे बाकी आहे. काही ठिकाणी खडीकरण झाले आहे, त्याच्या मजबुतीकरणाची मागणी आहे. त्यासाठी अधिकाधिक निधी मिळायला हवा. विशेषत: मतदारसंघात समाविष्ट असलेल्या नगर तालुक्यातील काही भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.मतदार संघाला काय हवं1 कुकडी, पिंपळगाव जोगा पाणी नियोजन2 सुपा एमआयडीसीत भूमिपुत्रांना नोकरी3 दूध संघाचे पुनरूज्जीवन व्हावे4 वीजपुरवठ्यातील अडथळा दूर व्हावाका सुटले नाहीत प्रश्न?कुकडी व पिंपळगाव जोगातून पारनेर तालुक्यातील १४ गावांना कालव्यातून पाणी मिळते, पण जुन्नर तालुक्यातील गावे पाणी घेत असल्याने पारनेरमधील अळकुटी व शेजारील गावांना कमी पाणी पुरवठा होतो. कान्हूर पठार भागाला हक्काचे एक टीएमसी पाणी केवळ निधीअभावी मिळत नाही. पठार भागावर पाणी पोहचविण्यासाठी विजेचा होणारा खर्च लक्षात घेता ही योजना फक्त कागदावरच राहिली.

त्यांना काय वाटतं?मतदारसंघात आपण विकास कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. दुष्काळग्रस्त भागात जलयुक्त शिवार योजना राबवून सर्वाधिक बंधारे बांधले. शेततळी उभारली. पाऊस चांगला झाल्यास याचे परिणाम खूप चांगल्या प्रमाणात दिसून येतील. शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले. दुर्गम भागातील रस्ते व मोठे पूल उभारणी करून वंचित घटकातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यातून तेथील शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. - विजय औटी, आमदार

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर