शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

झेलम एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू : २६ मेंढ्या चिरडून ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 6:36 PM

झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.

श्रीरामपूर : झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झेलम एक्सप्रेस मनमाडहून अहमदनगरच्या दिशेने चालली होती. एम.आय.डी.सी. परिसरात मेंढ्या व एक व्यक्ती रेल्वेखाली सापडली. यात २६ मेंढ्या व एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्यापपर्यत ओळख पटलेली नसल्याचे शहर व रेल्वे पोलिसांनी सांगितले. झेलम एक्स्प्रेसच्या चालकाने श्रीरामपूर रेल्वे स्थानकाच्या अधिका-यांना अपघात घडल्याचे कळविले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर रेल्वे काही काळ घटनास्थळी थांबली होती. विशेष म्हणजे या गाडीची श्रीरामपूर येथे येण्याची वेळ सकाळी १० वाजून १० मिनिटे आहे. कालच ती उशिराने धावत होती. मयताची ओळख पटविण्याचे काम शहर पोलीस करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर