जेऊर हैबतीमध्ये एकावर तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:24 PM2019-06-14T12:24:14+5:302019-06-14T12:24:40+5:30

विनाकारण शिवीगाळ करून तलवारीने वार करून

In Jeur Habati, the sword was attacked by one | जेऊर हैबतीमध्ये एकावर तलवारीने हल्ला

जेऊर हैबतीमध्ये एकावर तलवारीने हल्ला

googlenewsNext

नेवासा : विनाकारण शिवीगाळ करून तलवारीने वार करून अंबादास कारभारी गायकवाड (रा. जेऊर हैबती) यांना जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुरूवारी अक्षय दिलीप उगले, शाहूराव भाऊराव उगले, दिलीप भाऊराव उगले व सुनील भाऊराव उगले यांच्याविरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
९ जूनला वादळामुळे जेऊर हैबती येथे वीज नसल्याने गायकवाड हे त्यांचा भाऊ सोपान यांच्याबरोबर कुकाणा येथे गेले होते. तेथे ते ओमसाई मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी बसलेले होते. त्यावेळी तेथे येऊन आरोपींनी शिवीगाळ करून गळ्यावर तलवार मारली. दोन्ही हात मध्ये घालून गळ्यावरील तलवारीचा वार चुकविला. या दरम्यान हातावर दोन तीन वार झाले होते. हातातून जास्त रक्त वाहू लागल्याने आरडाओरड केल्याने जवळच असलेल्या दुकानातील त्यांचा भाऊ सोपान व इतर लोक जमा झाल्यानंतर आरोपींनी पळ काढला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले गायकवाड यांना रूग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया करण्

Web Title: In Jeur Habati, the sword was attacked by one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.