श्रीगोंद्यात स्वस्त धान्य दुकानांवर छापे, दुकानदारांना नोटीसा बजावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 03:17 PM2020-04-14T15:17:06+5:302020-04-14T15:17:16+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी मंगळवारी दुपारी श्रीगोंदा शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. तहसीलदारांच्या अचानक तपासणीने स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. स्वस्त धान्याचा काळाबाजार केला तर तत्काळ गुन्हे दाखल करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. एप्रिल महिन्याचे धान्य तालुक्यात १२४ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे यामध्ये गहू तांदूळ साखरेचा समावेश आहे.

 Impressions on cheap grain shops in Shrigondi, notices to shopkeepers | श्रीगोंद्यात स्वस्त धान्य दुकानांवर छापे, दुकानदारांना नोटीसा बजावणार

श्रीगोंद्यात स्वस्त धान्य दुकानांवर छापे, दुकानदारांना नोटीसा बजावणार

Next

श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी मंगळवारी दुपारी श्रीगोंदा शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तपासणी केली. तहसीलदारांच्या अचानक तपासणीने स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. स्वस्त धान्याचा काळाबाजार केला तर तत्काळ गुन्हे दाखल करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. एप्रिल महिन्याचे धान्य तालुक्यात १२४ स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात आले आहे यामध्ये गहू तांदूळ साखरेचा समावेश आहे.
आम्हाला धान्य मिळत नाही अथवा कमी दिले जाते. धान्य दराबाबत स्टाक बाबत फलक नसल्याच्या तक्रारी शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांनी केल्या त्यावर तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दुकाने तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. दोनतीन दिवसात ग्रामीण भागातील काही दुकानांना भेट देऊन तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय बनावट ग्राहक पाठवून उलट तपासणी करण्यात येणार आहे. धान्य वाटप करताना सोशल डिस्टेटींग पाळत नसल्याचे निदर्शनास आले त्यावर दुकानदार बरोबर त्यांनी ग्राहकांनाही सुचना दिल्या.
----
किराणा दुकानातील दर तपासले
तहसीलदार महेंद्र महाजन यांनी स्वस्त धान्य दुकानांना भेटी देत असताना काही किराणा दुकानातील शेंगदाणे साखर तेल याचे दर तपासले यामध्ये तफावत आढळून काही दुकानात शेंगदाणे १०० रुपये किलो तर तर काही दुकानात १३० रुपये किलो प्रमाणे विकले जात असल्याचे निदर्शनास आले.

Web Title:  Impressions on cheap grain shops in Shrigondi, notices to shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.