शहरं
Join us  
Trending Stories
1
Modi 3.0 : 'टीम मोदी'मध्ये कोण-कोण? मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी कुणा-कुणाला आला फोन? येथे पाहा 'लेटेस्ट लिस्ट'!
2
Adhir Ranjan Chowdhury : "जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी
3
समुद्र पाहण्यासाठी गेली अन् महागडा iphone पडला; ७ तास चालले बचावकार्य, Video
4
नरेद्र मोदींनी शपथविधीसाठी रविवारचा दिवसच का निवडला? प्रभू श्रीरामांसोबत आहे खास कनेक्शन!
5
इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका
6
नरेंद्र मोदी आज घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ; राज्यातून १२ जणांची मंत्रिपदासाठी चर्चा
7
IND vs PAK : दोन दिवसांपूर्वी जे झालं ते आम्ही आता विसरलोय; पाकिस्तानच्या कोचचं विधान
8
WI vs Uganda : 39 ALL OUT! 'अकेला' हुसैन! नवख्या संघाला स्वस्तात गुंडाळलं; विडिंजचा मोठा विजय 
9
‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर
10
खरी 'फायटर'! भारताच्या लेकीनं रचला इतिहास; देश गाढ झोपेत असताना गाठले यशाचे शिखर
11
ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा
12
ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध
13
पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत, तुमचा जबाब नोंदवायचा आहे, तरुणीला फसविण्याचा सायबर गुन्हेगाराचा प्रयत्न
14
शेलारांच्या मतदारसंघात भाजपचे मताधिक्य घटले, ॲड. उज्ज्वल निकम यांना बसला फटका
15
एकमेकांची उणीदुणी काढू नका, विधानसभेच्या तयारीला लागा, फडणवीसांनी कान टोचले
16
आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!
17
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच दोनशेपार, गतविजेत्या इंग्लंडची झाली हार! ॲडम झम्पाचा प्रहार
18
४ चौकार अन् १४ षटकार! अभिषेक शर्माचा सुपर शो कायम; २५ चेंडूत झळकावले शतक
19
राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत
20
लोकसभेचे अध्यक्षपद कोणाला मिळणार? ताणाताणीची शक्यता

हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात : शेवगाव तालुक्यात विहीरीत पडून महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:48 PM

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गोळेगाव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील गोळेगाव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे. गावातील अंजना बाबासाहेब फुंदे या विहिरीत पडून गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

 गावात पिण्याच्या पाण्याची अवस्था अतिशय दयनीय असल्याने मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी महिलांना धडपड करावी लागत आहे. सोमवार (दि.१३) रोजी सकाळी नऊ वाजता अंजना बाबासाहेब फुंदे ( वय ४५) या पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावालगतच असलेल्या साहेबराव आंधळे यांच्या विहिरीवर गेल्या असता बादलीच्या मदतीने पाणी शेंदत असताना पाय घसरून सात परस खोल विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर मोठी किंकाळी ऐकू आल्याने गावातील बंडू आंधळे, कचरू बडे, कालिदास डमाळे, गणेश आंधळे या युवकांनी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या महिलेला लोखंडी बाज बांधून वर काढले. यानंतर या महिलेस खासगी वाहनाने बोधेगाव येथील रूग्णालयात आणले मात्र गंभीर जखमी असल्याने तेथे प्रथमोपचार करून नगरला हलविण्यात आले.सदर महिलेची घरची परिस्थिती अतिशय दयनीय आहे पती मणक्याच्या आजाराने अनेक दिवसांपासून अंथरूणावर पडून आहेत. तर भूमीहिन असल्याने एक मूलगा बाहेगावी तर एक मूलगा गावातचं रोजंदारीने काम करतो. यामूळे सदरील महिलेला प्रशासनाकडून वैद्यकीय मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.  

टँकरसाठी तहसिलदारांना निवेदनशासनाने टँकरच्या माध्यमातून दिलेले पाणी पुरेसे नसून पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत आहे. त्यामुळे नागरीकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. तर महिलांसह लेकरांची पाण्यासाठी दमछाक होत असल्याने दुष्काळाची पीडा मिटत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. गोळेगावसाठी असणा-या टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा गोळेगाव ग्रामस्थांनी तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय