आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:19 AM2021-08-01T04:19:59+5:302021-08-01T04:19:59+5:30

संजीवनी उद्योग समूह-संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगावकरांनी मदत दिली. त्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आणखी भर घातली. हे ...

Humanity is paramount in a disaster | आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य महत्त्वाचे

आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य महत्त्वाचे

Next

संजीवनी उद्योग समूह-संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोपरगावकरांनी मदत दिली. त्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानने आणखी भर घातली. हे साहित्य चिपळूण पूरग्रस्तांपर्यंत शुक्रवारी (दि. ३०) रवाना करण्यात आले. सिद्धार्थ साठे, वासुदेव शिंदे, रवी रोहमारे या वेळी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, आपत्ती आणि संजीवनी उद्योग समूह, कोल्हे कुटुंबीयांची मदत हे एक समीकरण तयार झालेले आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावून येऊन आपत्तीग्रस्तांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, रोहित कनगरे, तळेगाव मळे येथील शनेश्वर मित्र मंडळाचे गोरख टूपके व गोरख टूपके, त्यांचे सहकारी, गौरव येवले, धनंजय नवले, सागर राऊत, नंदू केकान, सागर कोळपे, अजय शार्दुल, विशाल चोरगे, अनुराग येवले, महेंद्र नाईकवाडे, प्रशांत संत, विशाल गोर्डे उपस्थित होते.

..............

Web Title: Humanity is paramount in a disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.