हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:21 AM2021-01-23T04:21:57+5:302021-01-23T04:21:57+5:30

श्री साईचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ...

Harinam Week flag hoisting | हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण

हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण

Next

श्री साईचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे ८ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान दररोज पहाटे काकड भजन, सकाळी ८ ते ११ साईसचरित्र पारायण, सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान प्रख्यात महाराजांचे कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू.महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन नगरसेवक दत्तात्रय कोते व सप्ताह कमिटीने केले आहे.

ध्वजारोहणप्रसंगी नगरसेवक दत्तात्रय कोते तसेच सप्ताह कमिटीचे पोपट वाणी, कचरू सोनवणे, सुधाकर भालेराव, बबन गुंजाळ,ज्ञानेश्वर पवळे, ताराचंद भालेराव आदी गणेशवाडी ग्रामस्थ व महिला यांनी पूजन केले.

Web Title: Harinam Week flag hoisting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.