‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव...

By Admin | Published: March 26, 2017 12:02 AM2017-03-26T00:02:21+5:302017-03-26T00:02:21+5:30

वर्धापनदिन : मान्यवरांची उपस्थिती; मंगलमयी वातावरणात रंगला स्नेहमेळावा

Happy Holi on 'Lokmat' | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव...

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव...

googlenewsNext

सांगली : रंगांच्या सुंदर संगतीत सजलेली रांगोळी... विद्युत रोषणाईचा सुंदर साज... स्वागतासाठी सजलेले मंडप... संगीतमय धून... अशा सुंदर व प्रसन्न वातावरणात शनिवारी ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा १८ वा वर्धापनदिन पार पडला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, बँकिंग, शासकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उपमहापौर विजय घाडगे, सांगली शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, महापालिका उपायुक्त सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्या प्रा. सुषमा नायकवडी, नगरसेवक शेखर माने, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, वितरण विभाग प्रमुख अमर पाटील, इस्लामपूरचे विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार सदाशिवराव पाटील, हाफिज धत्तुरे, नितीन शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, महापालिका स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे, कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती मनोहर पाटील, आष्ट्याचे मुख्याधिकारी पंकज पाटील, तासगावचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, संचालक गणपती सगरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, संभाजी कचरे, शरद लाड, विक्रमसिंह सावंत, सुलभा अदाटे, जि. प.च्या माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, नगरसेवक राजेश नाईक, विष्णू माने, राजू गवळी, संतोष पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब काकडे, आष्ट्याच्या माजी नगराध्यक्षा झिनत अत्तार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी, माध्यमिक शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार, राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी, हुसेन कोरबू आदींचा समावेश होता.

यावेळी ‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, उपव्यवस्थापक (इलेक्ट्रॉनिक्स) भैय्यासाहेब देशमुख उपस्थित होते.


विशेषांकाचे प्रकाशन
वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘स्थानिक स्वराज्य’ या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी सकाळी सांगलीच्या गणपती मंदिरात वाचकांच्याहस्ते करण्यात आले. संग्राह्य अशा या विशेषांकात अनेक तज्ज्ञ लेखक व मान्यवरांनी लेखन केले आहे.


महापौरांची कार्यालयास भेट
महापौर हारुण शिकलगार यांनी शनिवारी सकाळी ‘लोकमत’च्या कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


दूरध्वनीवरून शुभेच्छा
खासदार संजयकाका पाटील, आ. पतंगराव कदम, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.


 

Web Title: Happy Holi on 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.