महात्मा फुले यांना नगरमध्ये अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:41+5:302021-04-12T04:19:41+5:30

अहमदनगर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या माळीवाडा येथील पुतळ्याला विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना लॉकडाऊनमुळे ...

Greetings to Mahatma Phule in the city | महात्मा फुले यांना नगरमध्ये अभिवादन

महात्मा फुले यांना नगरमध्ये अभिवादन

Next

अहमदनगर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या माळीवाडा येथील पुतळ्याला विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व नियमांचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली.

शिवसेनेच्या वतीने फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, माळीवाडा देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, संजय हजारे, गणेश कोल्हे, सुरेश इवळे, नाना आरे, संजय करपे आदी उपस्थित होते. यावेळी माजी महापौर फुलसौंदर म्हणाले, दीडशे वर्षापूर्वी भारतात फुले यांनी समाजसुधारणा सुरू केल्या. त्यामुळेच आज सामाजिक समता आपणास दिसून येत आहे. त्याकाळच्या भारतीय समाजरचनेत अनिष्ट रूढींविरुद्ध संघर्ष करीत समाज परिवर्तनाची बीजे रोवणारे समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांचे नाव अग्रभागी आहे. याप्रसंगी दत्ता कावरे, पंडितराव खरपुडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जयंती उत्सव शासनाच्या नियमांच्या अधीन राहून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

गणपती तालीमच्या वतीने माळीवाडा येथील फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बाबासाहेब पटवेकर, अभिषेक खंदारे, अक्षय आंबेकर, कमलेश खरपुडे, विशाल उदावंत, ऋषिकेश जगताप, सागर बनसोड, किरण दळवी, आकाश खंदारे उपस्थित होते.

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या आवारातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बँकेचे अध्यक्ष अनिलराव झोडगे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक नाथाजी राऊत, नामदेवराव लंगोटे, एकनाथराव जाधव, महेश झोडगे, श्याम जाधव, अमित झोडगे, सतीश पिंपळे, विजय धाडगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नाथाजी राऊत, नामदेवराव लंगोटे यांनीही मनोगतातून महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग व कार्याची माहिती दिली.

------------

चौकट : घरातच अभिवादन

बोरुडे मळा येथील माजी उपमहापौर अनिल बोरुडे व नगरसेविका पुष्पा बोरुडे यांनी रविवारी सकाळी घरामध्येच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कोणीही घराबाहेर पडू नये. महात्मा फुले यांना घरात बसूनच अभिवादन करावे, असा संदेशही त्यांनी सोशल मीडियातून दिला.

(फोटो- ११ अनिल बोरुडे)

--------

फोटो- ११ शिवसेना

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, माळीवाडा देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे आदी.

Web Title: Greetings to Mahatma Phule in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.