आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था सरकारने करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:19 AM2021-04-15T04:19:08+5:302021-04-15T04:19:08+5:30

कोरोना महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती संपूर्ण लॉकडाऊनशिवाय आटोक्यात येणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनबाबत संघटना सरकारसोबत आहे. ...

The government should provide health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था सरकारने करावी

आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था सरकारने करावी

googlenewsNext

कोरोना महामारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ती संपूर्ण लॉकडाऊनशिवाय आटोक्यात येणे शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनबाबत संघटना सरकारसोबत आहे. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा. मागील लॉकडाऊन काळात आरोग्य कर्मचाऱ्यांचे खूप हाल झाले. वाहन व्यवस्था नसल्याने काहींना रोज ८ ते १० किलोमीटर पायपीट करावी लागली. यात महिला नर्सिंग कर्मचारी त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी त्यांची कर्तव्यावर जाण्या - येण्याची व्यवस्था सरकारने करावी. रात्रंदिवस सेवा पुरविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना सरसकट एक वेतन वाढ द्यावी. त्यांना ५० लाखांचे विमा कवच नव्याने चालू करावे. आरोग्य विभागात कर्मचारी वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केल्यास काम करण्यासाठी व या महामारीचा समूळ नष्ट करण्यासाठी उत्साह येणार आहे. त्यामुळे सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: The government should provide health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.