जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सरकारी मोहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:27 AM2021-02-25T04:27:03+5:302021-02-25T04:27:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नावे अखेर राजपत्रात झळकली असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा ...

Government seal on the Board of Directors of the District Bank | जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सरकारी मोहर

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर सरकारी मोहर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची नावे अखेर राजपत्रात झळकली असून, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी याबाबतची अधिसूचना बुधवारी सायंकाळी जाहीर केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकालपत्र निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांना सादर केले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना आवश्यक असते. ही अधिसूचना प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेचा महत्वाचा टप्पा पार पडल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. जिल्हा बँकेसाठी जिल्हा उपनिबंधक आहेर यांची नेमणूक झालेली आहे. त्यांच्याकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल. पदाधिकारी निवडणुकीसाठी कमीत- कमी ७, तर जास्तीत-जास्त १५ दिवस इतका कालावधी असतो. त्यामुळे प्रशासनाने ठरविल्यास पुढील सात दिवसात निवडणूक होऊ शकते.

जिल्हा बँकेवर २१ संचालक निवडून आलेले आहेत. विविध मतदारसंघातील १७ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक झाली. बिनविरोध निवडीत सर्वच राजकीय पक्षांना एकमेकांची मदत झालेली आहे. जिल्हा बँकेत कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष हा सहमतीनेच निवडला जाईल. महाविकास आघाडीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वाधिकार आहेत. हे दोन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याने अध्यक्ष- उपाध्यक्ष पदासाठी वरिष्ठ नेत्यांकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

....

राजकीय पक्षांच्या बैठकांचे फड रंगणार

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसला असतानाच अधिसूचना सहनिबंधक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरविण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठकांचे फड रंगणार असल्याचे चित्र आहे.

Web Title: Government seal on the Board of Directors of the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.