शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 12:20 PM

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

रोहित टेके  /  कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

 गोधेगावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. या गावात २०१९ या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास १०० तरुणांचे विवाह झाले आहेत. नवीन विवाह झाला की घरात पाळणा हलण्याचे वेध कुटुंबीयांसह नातेवाईकांना लागतात. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे लोण थेट ग्रामीण भागातही पसरले आहे.

 रविवारी ममदापूर (ता़राहाता) येथील तरुण कोरोनाबाधित आढळला. या तरुणाचा संपर्क गोधेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी तातडीने सोमवारी (दि.१ जून) कोरोनाच्या उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्सिंगने विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत विविध निर्णय घेण्यात आले. 

गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना सभेत आवाहन करण्यात आले. २०२० व २०२१ या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये. कारण यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता नवविवाहितांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाचा प्रभाव दूर होईपर्यंत अपत्य जन्मास न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटकाळात गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाला नाही तर मातेच्या व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मागील आठवड्यात नगर येथील कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुस-या दिवशीच तिचा मृत्यू झाला. अशी वेळ आपल्या गावातील कुणावरच येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.                                                                                     -अशोक भोकरे, सरपंच, गोधेगाव, ता. कोपरगाव.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याKopargaonकोपरगाव