२५ जानेवारीपासून घोड-विसापुरचे आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:08 AM2021-01-23T11:08:04+5:302021-01-23T11:09:16+5:30

श्रीगोंदा (जि. अहमदनगर):  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर  घोड-विसापुर आवर्तन सोडण्याच्या वेळापत्रकात जलसंपदा विभागाला बदल करावा लागला आहे.  घोड व विसापूरचे आवर्तन सोमवार दि. २५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. 

Ghod-Visapur cycle will be released from January 25 | २५ जानेवारीपासून घोड-विसापुरचे आवर्तन सोडणार

२५ जानेवारीपासून घोड-विसापुरचे आवर्तन सोडणार

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर):  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर  घोड-विसापुर आवर्तन सोडण्याच्या वेळापत्रकात जलसंपदा विभागाला बदल करावा लागला आहे.  घोड व विसापूरचे आवर्तन सोमवार दि. २५ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. 

विसापुरचे १ फेब्रुवारी तर घोडचे आवर्तन 10 फेब्रुवारीपासुन आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा बॅकेचे माजी संचालक शिवाजीराव पाचपुते,  जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनीलराव पाचपुते,  भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी घोडचे आवर्तन लवकर सोडावे म्हणून आंदोलनाचा इशारा दिला. 

तर विसापुरचे आवर्तन लवकर सोडावे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा,   समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय डाके यांनी पत्रक काढले होते.

 *बैठकीत ठरणार नियोजन* 

घोड विसापुरचे आवर्तन दि २५ जानेवारीला  सोडण्याबाबत सोडणेबासत संबंधित उपाभियंतांना आदेश दिले आहेत. विसापूरचे आवर्तन सोडण्यापुर्वी सोमवारी सकाळी पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक घेऊन नियोजन करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिली.

Web Title: Ghod-Visapur cycle will be released from January 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.