शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

दरोडेखोरांची टोळी गजाआड : १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 5:24 PM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(दि़२२) रात्री नगर-मनमाड रोडवरील देहरेटोलनाका परिसरात कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली़

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(दि़२२) रात्री नगर-मनमाड रोडवरील देहरेटोलनाका परिसरात कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली़ या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले़ अंधाराचा फायदा घेऊन दोघे फरार झाले़अल्तमश नासीर पठाण (वय २१), सिराज उर्फ सोल्जर आयुब शेख (वय २३) अविनाश श्रीधर साळवे (वय २०), सागर गोरख मांजरे (वय २०), भाऊसाहेब मधुकर गोरे (वय २६) व शहारुख निसार पिंजारी (वय २२ रा़ सर्व श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ सिराज उर्फ सोज्लर शेख यांची गँग नगर-मनमाड रोडने कोठेतरी दरोडा टाकण्यास जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस हेड कॉस्टेबल मन्सूर सय्यद, मनोहर गोसावी, योगेश गोसावी, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, संतोष लोढे, विशाल दळवी, राहुल सोळुंके, रवीकिरण सोनटक्के, दीपक श्ािंदे, विजय ठोंबरे, मच्छिंद्र बर्डे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने आरोपींना सापळा लावून अटक केली़ या आरोपींकडून एक लोखंडी सुरा, कटावणी, एक सत्तूर, लाकडी दांडके, नायलॉन दोरी, मोबाईल, चार मोटारसायकली जप्त केल्या़ आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़आरोपी सराईत गुन्हेगारपोलीसांनी पकडलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर श्रीरामपूर सह तोफखाना, भिंगार, राहुरी या पोलीस ठाण्यात जोरी, जबरी चोरी, मारहाण दरोडे खून, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ सिराज शेख याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आलेली आहे़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस