शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

गणेशोत्सवात घुमणार पारंपारिक वाद्यांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:11 PM

श्रीगोंदा हिंदू- मुस्लीम ऐक्याची भूमी आहे. गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करू, परंतु प्रशासनाने गणेश मंडळांना तातडीने रात्रभर वीज कनेक्शन व पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी सवलत द्यावी, अशी भावना श्रीगोंदा येथील बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी व्यक्त केली

ठळक मुद्देशांतता समिती बैठक : नियमांच्या चौकटीत उत्सव साजरा करण्याचे आवाहन
श्रीगोंदा : श्रीगोंदा हिंदू- मुस्लीम ऐक्याची भूमी आहे. गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करू, परंतु प्रशासनाने गणेश मंडळांना तातडीने रात्रभर वीज कनेक्शन व पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी सवलत द्यावी, अशी भावना श्रीगोंदा येथील बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी व्यक्त केली गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शांतता समिती व मंडळ प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार म्हणाले, गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे. पोलीस प्रशासनाची सकारात्मक दृष्टीने मदत करण्याची तयारी आहे. नंदकुमार ताडे यांनी ढोली बाजा वाजविण्यासाठी परवानगी मिळावी, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्ते खड्डे बुजविण्यात येतील, असे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी सांगितले. पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे म्हणाले, यंदा दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे कोणावरही वर्गणीसाठी सक्ती करु नये. याबाबत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. वाद्यांच्या आवाजावर मर्यादा ठेवावी लागेल. डीजे वाजविल्यास संबंधित मंडळाच्या अध्यक्षाविरुध्द गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सन २०१६ चा गणेशोत्सव शिस्तबध्दबपणे साजरा केल्याबद्दल सद्भावना, हनुमान व राष्ट्र तेज या गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अवैध धंदे व गुन्हेगारांच्या विरोधात मोहिम सुरु केल्याबद्दल पोलीस निरीक्षक पोवार यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, राजू गोरे, घन:श्याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, सतीश बोरा, राजेश डांगे, सतीश पोखर्णा, नंदकुमार ताडे, प्रशांत दरेकर, नाना कोंथिबिरे उपस्थित होते.