पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी साकारली बियाणांची गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:19 AM2021-09-13T04:19:56+5:302021-09-13T04:19:56+5:30

पारंपरिक बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कल्पकतेने गणपतीची ...

Ganesha idol of seeds made by Padma Shri Rahibai Popare | पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी साकारली बियाणांची गणेशमूर्ती

पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी साकारली बियाणांची गणेशमूर्ती

Next

पारंपरिक बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या राहीबाई व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कल्पकतेने गणपतीची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती तयार करताना निसर्गातील विविध रंगछटा आणि वेगवेगळे आकार असलेल्या बियांचा वापर केलेला आहे. यासाठी त्यांनी तृणधान्य, गळीतधान्य, तेलबिया व भाजीपाल्याच्या विविध बियाणांचा वापर केलेला आहे. दररोज या बाप्पाची मनोभावे संपूर्ण कुटुंबाकडून पूजा केली जाते. विशेष म्हणजे या बाप्पाची स्थापना आपल्या बियाणे बँकेतच केली आहे, तर आजपर्यंत त्यांना देश आणि विदेशात मिळालेले पुरस्कार व सन्मानचिन्ह यांची त्या भोवती सुंदर आरास तयार केली आहे.

..........

प्रत्येक गावात गावरान बियाणांची बँक तयार होऊ दे. शेतकरी राजाला समाधानाचे दिवस येऊ देत. पाऊसपाणी चांगला होऊ दे आणि कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

-राहीबाई सोमा पोपरे

Web Title: Ganesha idol of seeds made by Padma Shri Rahibai Popare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.