चार तास मृतदेह रुग्णालयाबाहेर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:00+5:302021-04-16T04:21:00+5:30

नेवासा फाटा : येथील एका खासगी रुग्णालयात ‘एचआरसीटी’साठी आलेल्या ज्येष्ठ रुग्णाचा रुग्णालयाबाहेरच गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर मृताचा मुलगा ...

Four hours of bodies lying outside the hospital | चार तास मृतदेह रुग्णालयाबाहेर पडून

चार तास मृतदेह रुग्णालयाबाहेर पडून

Next

नेवासा फाटा : येथील एका खासगी रुग्णालयात ‘एचआरसीटी’साठी आलेल्या ज्येष्ठ रुग्णाचा रुग्णालयाबाहेरच गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. त्यानंतर मृताचा मुलगा व सून यांनी तब्बल चार तास रुग्णवाहिकेसाठी ठिकठिकाणी संपर्क केला. मात्र कोठूनच मदत मिळाली नाही. अखेर पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी ग्रामीण रुग्णालयात संपर्क करून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

नेवासा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधित आढळून येणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी एचआरसीटी (स्कॅन) केले जाते. त्याचा स्कोर पाहून रुग्णांवर उपचार केले जातात. त्यासाठी एचआरसीटी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गुरुवारी सकाळी नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथील एक वयोवृद्ध व्यक्ती मुलगा व सुनेबरोबर नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात एचआरसीटी करण्यासाठी आले होते. तेथे तपासणी होण्याअगोदर रुग्णालयाबाहेरच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा व सुनेने मृतदेह गावी नेण्यासाठी अनेक ठिकाणी रुग्णवाहिकेसाठी फोन केले. मात्र कोणीच मदत केली नाही. त्यानंतर ही बाब पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस वाहन चालक भवार यांना कोणी तरी सांगितली. त्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयास हा प्रकार कळविला. त्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. दरम्यान, त्या वृद्धाची एका खासगी डॉक्टरांनी तपासणी केली व त्यांना मयत घोषित केले. त्यानंतर त्यांना नातेवाईक अंत्यविधीसाठी घेऊन गेले.

Web Title: Four hours of bodies lying outside the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.