माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:31 AM2018-06-24T10:31:03+5:302018-06-24T10:44:06+5:30

गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले.

Former Justice B.G. Coalse mother to mother | माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक

googlenewsNext

राहुरी : गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 
कौसल्याबाई कोळसे यांना जिरायती जमीन असल्याने दुस-यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण केले.   बी. जी. कोळसे यांना न्यायमूर्ती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. नानी म्हणून परिचित असलेल्या कौसल्याबाई यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यानंतर कोळसे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण घेतले. गुहा येथील आठ एकर क्षेत्र जमीनीचे काय करायचे असा प्रश्न कौसल्याबाई यांनी मुलांपुढे मांडला. गंगाधर बाबा छात्रायल सुरू करण्याची संकल्पना त्यांनी उचलून धरली. मुलाकडे पुण्याला न राहता त्यांनी गुहा येथे अनाथ मुलांमध्ये राहणे पसंत केले. शेकडो अनाथ मुलांच्या त्या नानी बनल्या. कौसल्याबाई कोळसे यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली(सुमन घोगर व क मल देशमुख), सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या कौसल्याबाई यांच्या शंभरी निमित्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आज दुपारी गुहा येथे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: Former Justice B.G. Coalse mother to mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.