गावात प्रवेश नाकारल्याने महिला सरपंचास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 08:16 PM2020-05-13T20:16:59+5:302020-05-13T22:16:58+5:30

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे लॉकडाउनमध्ये अनधिकृत विहिरीचे बांधणीचे काम करण्यासाठी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाºया चौघांना हटकल्यामुळे महिला सरपंचास मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Female sarpanch beaten for refusing entry to village | गावात प्रवेश नाकारल्याने महिला सरपंचास मारहाण

गावात प्रवेश नाकारल्याने महिला सरपंचास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे लॉकडाउनमध्ये अनधिकृत विहिरीचे बांधणीचे काम करण्यासाठी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाºया चौघांना हटकल्यामुळे महिला सरपंचास मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यात पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे ग्रामसुरक्षा समितीने गाव बंद केलेले असताना ससेवळण येथे किसन प्रल्हाद काळे, किरण किसन काळे, अरविंद किसन काळे, अमोल किसन काळे (रा.सर्व पोखरी बाळेश्वर, ता.संगमनेर ) यांनी पाझर तलाव क्रमांक २ येथे अनधिकृत विहिरीचे बांधणीचे काम करण्यासाठी गावात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना गावात प्रवेश करू न दिल्याचा राग आल्याने या चौघांनी येथील महिला सरपंच मनीषा अर्जुन फटांगरे (रा.पोखरी बाळेश्वर ता.संगमनेर) यांना शिवीगाळ करून दगडाने मारहाण केली. पोखरी बाळेश्वरच्या सरपंच मनीषा फटांगरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Female sarpanch beaten for refusing entry to village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.