साई सूर्य सेवातर्फे महिला दिनानिमित्त नेत्र शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:02+5:302021-03-04T04:40:02+5:30

अहमदनगर : चष्मा किंवा दृष्टिदोष असलेल्यांना आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. युवकांना सैन्यभरती, पोलीस भरती, पायलट, नेव्ही, ...

Eye surgery camp on the occasion of Women's Day by Sai Surya Seva | साई सूर्य सेवातर्फे महिला दिनानिमित्त नेत्र शस्त्रक्रिया शिबिर

साई सूर्य सेवातर्फे महिला दिनानिमित्त नेत्र शस्त्रक्रिया शिबिर

Next

अहमदनगर : चष्मा किंवा दृष्टिदोष असलेल्यांना आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. युवकांना सैन्यभरती, पोलीस भरती, पायलट, नेव्ही, एम.पी.एस.सी., यूपीएससी यांसारख्या संधी सोडून द्याव्या लागतात, तर युवतींना चष्मा व दृष्टिदोष असल्यास लग्नास नकार दिला जातो. बऱ्याच मुलींची लग्न होत नाहीत, ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. यासाठी अहमदनगरच्या डॉ. कांकरियांच्या साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेतर्फे मागील ३५ वर्षांपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेसर नेत्रशस्त्रक्रियेद्वारे हा दृष्टिदोष घालवून व चष्म्यापासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ‘विवाहदृष्टीभेट’ योजना राबविली जाते. या विशेष लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात युवती व महिलांना विशेष सवलत दिली जाते, अशी माहिती या शिबिराच्या संयोजिका नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली. आजपर्यंत या शिबिरातून उपचार झाल्यानंतर स्वत: लग्नपत्रिका आणून देण्याची प्रथा बऱ्याच युवती पाळतात. अशा १२ हजाराहून अधिक लग्नपत्रिका आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रृतिका कांकरिया यांनी सांगितले. मायनस ०.५ पासून मायनस ३०.० पर्यंत व प्लस १८.० पर्यंत नंबर घालविण्याच्या एकूण दीड डझनापेक्षा अधिक पद्धती एकाच छताखाली असणारी साई सूर्य नेत्रसेवा ही अहमदनगरची संस्था भारतातील पहिली संस्था आहे. त्यात मागील २ वर्षांपासून कॉन्टयूरा ही जगातील सर्वात आधुनिक लेसर उपचार पद्धती भारतात प्रथमच आणून ती लॅसीक व स्माईल या उपचार पध्दतीपेक्षा अधिक अचूक व परिणामकारक ठरली आहे. यामध्ये नुसता चष्म्याचा नंबरच जात नाही तर चष्म्यापेक्षा अधिक चांगले विनाचष्मा दिसते. या कॉन्टयूरा लेसर उपचार पद्धतीचादेखील लाभ या शिबिरात मिळणार आहे. या शिबिरात साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर बरोबरच एशियन आय हॉस्पिटल पुणे यांचाही सहभाग राहणार आहे. कोविड संसर्गामुळे एकाच दिवशी गर्दी न करता ८ मार्चपर्यंत नावनोंदणी करणाऱ्यांना पुढच्या तारखा दिल्या जातील व सर्व प्रकारची काळजी घेण्यात येणार आहे. ज्यांना चष्मा व दृष्टिदोष आहे, त्यांनी नंबरवर संपर्क करणे आवश्यक आहे. या नेत्रशिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया यांची संपूर्ण टीम सहभागी होणार आहे. त्याचा मोठा फायदा रुग्णांना होणार आहे. संपर्क साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर आणि एशियन आय हॉस्पिटल, ससूण रोड, पुणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वा. प्र.)

Web Title: Eye surgery camp on the occasion of Women's Day by Sai Surya Seva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.