अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 02:59 PM2020-07-31T14:59:47+5:302020-07-31T15:00:12+5:30

यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 

Eleventh entry is not a concern; 10 thousand more seats | अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

अकरावीच्या प्रवेशाची चिंता नाही; १० हजार जागा वाढीव 

Next

अहमदनगर : यंदा अकरावी प्रवेशाची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांनाही असणार नाही. कारण या वर्षी दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत तब्बल १० हजार जागा जादा उपलब्ध आहेत. 


दहावीचा आॅनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यात नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ६९ हजार ५३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६६ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा टक्क््यांनी निकाल वाढला. म्हणजे यंदा जादा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाची तयारी  सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर
यंदा जिल्ह्यासाठी कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त अशा शाखांसाठी तब्बल ७६ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्यात ४४० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात ४५३ अनुदानित, २९५ विनाअनुदानित, १९२ स्वयं अर्थसहित अशा एकूण ९४० तुकड्या आहेत. या सर्व तुकड्यांची क्षमता यंदा ७६ हजार ५५० विद्यार्थ्यांची आहे.
 
सर्वाधिक ३४ हजार जागा विज्ञानसाठी 
एकूण ७६ हजार ६६० जागांपैकी ३४ हजार (४४.३५ टक्के) जागा विज्ञान शाखेसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर २९ हजार ६०० जागा कला शाखेसाठी, १० हजार ९७० जागा वाणिज्य शाखेसाठी, तर २ हजार १२० जागा संयुक्त शाखेसाठी आहेत. 

विज्ञान शाखेत प्रवेश वाढणार 
नेहमीप्रमाणे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या ५४ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही ५० टक्क््यांच्या पुढे प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. दहावीत सुमारे ६६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण असून त्यातील ५० टक्के म्हणजे ३३ हजार विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तिच स्थिती असण्याची शक्यता आहे. 

Web Title: Eleventh entry is not a concern; 10 thousand more seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.