शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महावितरणच्या कर्जत येथील कार्यालयात वीज प्रश्नी हलगी बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 5:20 PM

कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी पलंबित विविध वीज प्रश्नासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ‘हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

कर्जत : कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी पलंबित विविध वीज प्रश्नासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ‘हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली. हे आंदोलन चार तास चालले. कामे पूर्ण करू, अशी ग्वाही अधिक्षक अभियंता यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.महावितरणकडील ६३ ऐवजी १०० ची रोहित्रे बसवावीत, कर्जत तालुक्यातील इन्फ्रा दोनमध्ये मंजूर झालेली रोहित्र तात्काळ बसवावीत, इतर मंजूर कामे सुरू करावीत, सिंगल फेजची कामे पूर्ण करावीत, कर्जत येथील बापूराव कदम यांच्या बिनशेती प्लॉटमध्ये महावितरणने विना परवाना काम केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. सुरक्षा रक्षक भरतीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. दुरूस्तीची कामे देताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, आदी प्रलंबित कामे करावीत यासाठी कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सोमवारी रिपाइंचे पदाधिकारी व कार्यकर्ते याबाबत चौकशी करण्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक होलमुखे यांच्या कार्यालयात गेले असता तेथे अधिकारी उपस्थित नव्हते. इतर कर्मचा-यांनी व्यवस्थित माहिती न दिल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात व कार्यकारी अभियंता यांच्या दालनात हलगी बजाओ आंदोलन केले. हलगीच्या आवाजाने कार्यालयात गर्दी झाली होती. यानंतरकार्यकारी अभियंता यांच्या रिकाम्या खुचीर्ला हार घालून गांधीगिरी केली. सहाय्यक कार्यकारी अभियंता शैलेश जैन यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र यावर आंदोलकांचे समाधान झाले नाही. अधीक्षक अभियंता बोरसे यांनी आंदोलकांशी दुरधवनीवरून चर्चा केली. आठ दिवसांत तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे, अतुल भैलुमे, सचिन धेंडे, किरण भैलुमे, धिरज पवार, सनी वेळेकर, जमीर शेख, लखन भैलुमे, सागर कांबळे, श्रीधर पवार, अनुराग भैलुमे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतmahavitaranमहावितरण