जिल्ह्यास मंगळवारी ४९.५ मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन मिळाला;नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:37 PM2021-04-28T12:37:32+5:302021-04-28T12:39:08+5:30

अहमदनगर :  कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्णांसाठी आवश्यक मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. राज्य शासनाने अहमदनगर जिल्हयासाठी दैनंदीन ...

District gets 49.5 metric tonnes of liquid oxygen on Tuesday; citizens should not believe any rumors: Collector | जिल्ह्यास मंगळवारी ४९.५ मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन मिळाला;नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी 

जिल्ह्यास मंगळवारी ४९.५ मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन मिळाला;नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी 

googlenewsNext

अहमदनगर :  कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्णांसाठी आवश्यक मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली
आहे. राज्य शासनाने अहमदनगर जिल्हयासाठी दैनंदीन 50 मे.टन कोटा ठरवून दिलेला आहे. तेेेेवढा तेवढा ऑक्सिजन जिल्ह्यात मिळाला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये; असे आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

 

दिनांक 27 रोजी  अहमदनगर जिल्हयासाठी एअर लिक्वीड- 27 मे. टन, लिंन्डे- 19 मे.टन व टी.एन.एस- 3.5 मे.टन असे मिळून एकुण 49.5 मे.टन लिक्वीड
ऑक्सीजन प्राप्त झालेला आहे. आज दिनांक 28 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हयास 50 मे. टन लिक्विड ऑक्सीजनचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

Web Title: District gets 49.5 metric tonnes of liquid oxygen on Tuesday; citizens should not believe any rumors: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.