साई संस्थानचे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मतभेदाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:08+5:302021-01-23T04:22:08+5:30

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, नीलेश कोते, ...

Disagreement between the administration of Sai Sansthan and the villagers | साई संस्थानचे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मतभेदाची ठिणगी

साई संस्थानचे प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मतभेदाची ठिणगी

googlenewsNext

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, नीलेश कोते, नितीन कोते, दिगंबर कोते, भानुदास गोंदकर, संदीप पारख, संजय शिंदे, राहुल गोंदकर, सचिन कोते, विजय जगताप, रवींद्र गोंदकर, धनंजय गाडेकर, नीलेश गंगवाल, संदीप लुटे, योगेश ओस्तवाल, मनोज लोढा आदींच्या शिष्टमंडळाने संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांची भेट घेतली. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

गेट नंबर तीन व चार सुरू करण्यात यावे. दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांचे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व अल्पोपाहाराची सुविधा देण्यात यावी. ग्रामस्थांची दर्शन व्यवस्था सुलभ करावी. संस्थान कर्मचारी तिलक बागवे यांचे अन्यायकारक पद्धतीने करण्यात आलेले निलंबन मागे घ्यावे. या बैठकीत अधिकारी व ग्रामस्थांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेदही झाले.

तीन व चार क्रमांकाचे गेट उघडण्यास असमर्थता व्यक्त करतांनाच ग्रामस्थांच्या दर्शनाची नियमावली तयार करून शासनाकडे सादर करणार असल्याच्या सीईओ बगाटे यांच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. सोमवारपर्यंत संस्थानच्या भूमिकेत बदल झाला नाही तर नाईलाजास्तव पुढचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे आदींनी दिला आहे.

.............

कोविड नियमानुसार अधिक दरवाजे उघडण्यावर निर्बंध आहेत. कुणाची गैरसोय करणे उद्देश नाही, वस्तुस्थितीवर आधारित निर्णय घ्यावा लागेल, ग्रामस्थांच्या दर्शनाची नियमावली तयार करून तदर्थ समितीकडे पाठवली आहे. त्यावर समितीत मतमतांतरे आहेत. कर्मचारी बागवे यांनी केलेले प्रमाद गंभीर आहेत. चौकशी करून महिनाभरात त्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

-कान्हुराज बगाटे, सीईओ

Web Title: Disagreement between the administration of Sai Sansthan and the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.