Democrat on District Collectorate to get justice for Kiran Jagtap | किरण जगतापला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा
किरण जगतापला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

अहमदनगर : मयत किरण जगताप याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जगताप याला न्याय मिळावा, या मागणीसाठी नातेवाईक, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
या घटनेप्रकरणी प्रशासनाने तातडीने करावी अशी मागणी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले़ यावेळी वसंत लोढा, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, नगरसेवक प्रशांत गायकवाड, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत काळोखे आदी उपस्थित होते़

नगर शहरातील पुणे बसस्थानकावर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनेरी बसचे तिकीट घेत असताना रांगेत किरण आणि जहागिरदार नावाच्या व्यक्तींमध्ये वाद झाला़ यावेळी जहागिरदार याने फोन करून काही तरुणांना बोलावून घेतले़ त्यांनी किरण याला लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली़ यात किरण याच्या डोक्याला गंभीर मार लागला़ त्याच्यावर एक महिन्यापेक्षा काळ जास्त हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ अखेर ४ जून रोजी किरण याचा मृत्यू झाला़ 


Web Title: Democrat on District Collectorate to get justice for Kiran Jagtap
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.