बेकायदा सहल काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:26+5:302021-02-23T04:33:26+5:30

या प्रकरणाची दखल घेत राज्य मानव अधिकार आयोगाने तक्रार दाखल करूनदेखील पोलिसांनी या प्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल केलेला नाही. ...

Demand to file a case in case of illegal travel | बेकायदा सहल काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

बेकायदा सहल काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next

या प्रकरणाची दखल घेत राज्य मानव अधिकार आयोगाने तक्रार दाखल करूनदेखील पोलिसांनी या प्रकरणी अद्यापि गुन्हा दाखल केलेला नाही. सावेडी येथील डॉन बॉस्को विद्यालयाने १७ जानेवारी २०१९ रोजी शिक्षण विभागाच्या परवानगीविना खासगी बसणे वसई विरार येथे बेकायदेशीर सहल नेली होती. या प्रवासामध्ये आळेफाटा (जि. पुणे) परिसरात बसचा अपघात होऊन त्यामध्ये या शाळेचा एक शिक्षक, आरामबसचा क्लिनर, अपघातग्रस्त टेम्पोचा चालक अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये २२ ते २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. शिक्षण विभागाची परवानगी न घेता खासगी आरामबसने शालेय विद्यार्थ्यांची सहल काढणे हे सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर कृत्य होते. हा ठपका ठेवत शिक्षण विभागाने चौकशीमध्ये या शाळेचे मुख्याध्यापक आणि इतरांना दोषी ठरविले आहे. मात्र, या संस्थेने अथवा शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व इतर दोषी व्यक्तींवर या अपघाताची गंभीरता लक्षात न घेता कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. या घटनेशी संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

Web Title: Demand to file a case in case of illegal travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.