मन करारे प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:44 PM2020-01-05T13:44:05+5:302020-01-05T13:44:43+5:30

आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल.

Delightful in heart | मन करारे प्रसन्न

मन करारे प्रसन्न

googlenewsNext

अध्यात्म विशेष / 
आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल. आपणास प्रश्न पडेल मन हे इंद्रिय आहे का ? हो पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व अकराव मन आहे. मन हे न दिसणार परंतु वायूपेक्षा अफाट वेग असलेल इंद्रिय आहे. आपल्या  म्हणूनच आपण सहजच म्हणतो त्यांची मन:स्थिती ठीक नाही. मन उदास आहे मन प्रसन्न वाटत वगैरे. मध्यंतरी आंध्रप्रदेशात डॉक्टर मुलीवर घडलेल्या अमानुष बलात्काराची घटना असो की निर्भयाची. अशा घटना देश विदेशात सातत्याने घडतात. निषेध, मोर्चे निघतात. आपण हळहळतो. विविध यंत्रणेला दोष देतो. मन खिन्न होते. असे प्रसंग आपल्या वाट्याला नकोत अशी काळजी मनात निर्माण होते. तर कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या  बातम्या ऐकल्या की आपल्या सैनिकाप्रती किंवा त्यामागे असणाºया खंबिर मनाच्या नेतृत्वाप्रती आभिमानाने ऊर भरुन येतो. दोन्हीही घटना या मनातील कुविचार व सामर्थ्यशाली विचारामुळे घडतात हे आपल्या लक्षात येईल. कुविचारी प्रवृत्तीला सुसंस्कृत करावे लागेलच. परंतु कुप्रवृत्तीकडुन अचानक होणाºा अन्यायाविरुध्द प्रतिकार करणाºया दुबळ्यामनोवृत्तीला खंबिर पणाचे संस्कार करावे लागतील. हा विषय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांना लागु पडेल. या विश्वातील प्रत्येकाची धडपड आनंदासाठी, यशासाठी असते. प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षा  असते की सर्वात गुणवंत यशस्वी मुले आमची असावीत. समाज हे मोठे विद्यापीठ आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथील लोकांच्या वागण्या-बोलण्यातून एकमेकांच्या मनावर न कळत संस्कार होत असतात. मग ते शिक्षक असो, मित्र असो की आई वडील. समाजातील आदर्श व्यक्ती, उपासना, पंथ आदी मनावर संस्कार घडवितात.  
-राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर.

Web Title: Delightful in heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.