शेतीची मशागत खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:44+5:302021-05-07T04:22:44+5:30

.... नालेसफाईसाठी निविदा मागविल्या अहमदनगर : पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. निविदा प्राप्त झाल्यानंतर कार्यारंभ आदेश ...

Cultivation of agriculture was delayed | शेतीची मशागत खोळंबली

शेतीची मशागत खोळंबली

Next

....

नालेसफाईसाठी निविदा मागविल्या

अहमदनगर : पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईसाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. निविदा प्राप्त झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन शहरातील नालेसफाईचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

....

नगरसेवकांनासाठी निधी

अहमदनगर : चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या नगरसेवकांचा स्वेच्छा निधी शंभर टक्के खुला करण्यात आला आहे. या निधीतून नगरसेवकांकडून कामे सुचविण्यात येत असून, ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

.....

महामार्गावर भाजी विक्री

अहमदनगर : शहरात भाजी विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेर महामार्गावर भाजी विक्रेत पथारी टाकून बसत असून, प्रवासी वाहने उभी करून भाजी व फळे विकत घेताना दिसतात.

...

खेळते भांडवल योजनेतून कर्ज वाटप

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने खेळते भांडवल योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मागील वर्षीप्रमाणे कर्ज वाटप करण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी खेळते भांडवल योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

Web Title: Cultivation of agriculture was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.