गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:18 AM2020-12-23T04:18:46+5:302020-12-23T04:18:46+5:30

फसवणूक प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी राहाता पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती. बिना सोनवणे तिचा पती दिनेश सोनवणे (रा. ...

The crime should be investigated by CID | गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा

गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा

googlenewsNext

फसवणूक प्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी राहाता पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती. बिना सोनवणे तिचा पती दिनेश सोनवणे (रा. नाशिक) व भाऊसोहेब पेटकर (रा. लोणी) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे तीनही आरोपी फरार झाले असून, दोन महिन्यांनंतरही पोलिसांना सापडत नाहीत. यातील बिना सोनवणे ही राहाता येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत हंगामी शिक्षिका म्हणून काम करत होती, तर तिचा पती दिनेश हा धुळे येथे अधिकारी असल्याचे सांगितले जायचे. रयतमध्ये शिक्षकाची नोकरी लावून देतो, असे सांगत रयतचे दुसरे शिक्षक भाऊसाहेब पेटकर यांच्याशी बैठक घेत रोख रकमा, चेक किंवा ऑनलाइन पैसे स्वीकारले. दोन महिन्यांनंतरही यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: The crime should be investigated by CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.