नगर तालुक्यात कोरोना धोकादायक वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:20 AM2021-04-09T04:20:41+5:302021-04-09T04:20:41+5:30

मागील एप्रिल महिन्यापासून नगर तालुक्यातील १०६ गावांपैकी १०५ गावात कमी -अधिक संख्येने कोरोनाने शिरकाव केला आहे. एकमेव पांगरमल गावात ...

Corona dangerous turn in Nagar taluka | नगर तालुक्यात कोरोना धोकादायक वळणावर

नगर तालुक्यात कोरोना धोकादायक वळणावर

Next

मागील एप्रिल महिन्यापासून नगर तालुक्यातील १०६ गावांपैकी १०५ गावात कमी -अधिक संख्येने कोरोनाने शिरकाव केला आहे. एकमेव पांगरमल गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तालुक्यात सध्या ४२१ रुग्ण कोरोना बाधित असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याने तालुक्यात कोरोना धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ८३६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील १२२ जणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे. आतापर्यंत ४ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगर तालुक्यातील ५८ गावात मात्र कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसून सध्या एप्रिल महिन्यापासून तालुक्यातील ३९ गावात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

तालुक्यात नागरदेवळे गावात सर्वाधिक ३६१ रूग्णसंख्या झाली असून बुऱ्हाणनगर व नवनागापूर गावात प्रत्येकी ८ जणांचा बळी गेला आहे.

तालुक्यातील देहेरे प्राथमिक केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक ७८६ रुग्णसंख्या व सर्वाधिक २३ मृत्यूसंख्या झाली आहे. नगर तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. ४५ वर्षांपुढील ११ हजार जणांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी केंद्राबाहेर गर्दी होत आहे.

.......

३९ गावात सक्रिय रुग्णांची संख्या शून्य

केतकी, खांडके, पारगाव, आगडगाव, रतडगाव, वारूळवाडी, माथणी, रांजणी, बाळेवाडी, जांब, पिंपळगाव उजैनी, ससेवाडी, पांगरमल, पिंपळगाव कौडा, भोयरे पठार, भोयरे खुर्द, घोसपुरी, सांडवे, दशमीगव्हाण, मदडगाव, कोल्हेवाडी, देऊळगाव सिध्दी, राळेगण, खडकी, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद, गवळीवाडा, पिंपरी घुमट, नांदगाव, मठपिंप्री, हातवळण, शिराढोण, पारगाव मौला, तांदळी, वाटेफळ, हमिदपुर, हिवरेबाजार, इसळक या गावांमध्ये एप्रिल महिन्यात एकही रुग्ण नाही.

......

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रुग्ण ( कंसात झालेले मृत्यू )

मेहेकरी -२८८ ( ८ ),

चास - ६८३ ( २० ),

वाळकी -६४५- ( १६), जेऊर -५५५- ( १७), रुईछत्तीसी -२६४- ( ४), टाकळी खातगाव -५०६- ( १३), देवगाव -७०९ - ( १४), टाकळी काझी -४००- ( ७), देहरे - ७८६- ( २३)

.......

कोरोना बाधित टॉप टेन गावे

नागरदेवळे - ३६१, नवनागापूर -२८५,

वडगाव गुप्ता -२४०,

बुऱ्हाणनगर -२३५,

वाळकी-१८४, दरेवाडी -१७२,

जेऊर -१४०,

निंबळक- १३८, अरणगाव -१२४,

देहरे -१०२

.......

मृत्यूचे टॉप टेन गावे

बुऱ्हाणनगर - ८, नवनागापूर -८, वडगावगुप्ता -७,

नागरदेवळे -६,

जेऊर -६,

अकोळनेर -६,

सारोळा कासार -६,

वाळकी -५,

दरेवाडी -४,

पोखर्डी - ४

.........

Web Title: Corona dangerous turn in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.